आशिष देशमुख सायकलवर आले मिटिंगला

0
11

नागपूर,दि.23 : भाजपाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख हे आपल्या वादग्रस्त वक्तव्य व कृत्याने भाजपाला नेहमीच अडचणीत आणत असतात. रविवारीसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते सायकलने आले आणि पेट्रोल दरवाढीचा निषेध करीत सरकारला घरचा अहेर दिला.
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सकाळी खरीप आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्याचे सर्व आमदार, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सहभागी होण्यासाठी काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख हे चक्क चारचाकी गाडी सोडून सायकलने दाखल झाले. तेव्हा उपस्थित पत्रकारांनी त्यांना सायकलवर येण्याचे कारण विचारले तेव्हा आ. देशमुख यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे कारण सांगितले.