घोनाडी येथे माळी समाज सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

0
35

देवरी,दि.25ः- तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज विकास संस्था चिचगड/ घोनाडीच्यावतीने 22 एप्रिलला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या विवाहसोहळ्यात 11 जोडपी विवाहबध्द झाली.विवाह सोहळ्याची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करुन करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम  होते.कार्यक्रमाला सोमाजी गुरनुले,माळी-मरार समाज संघटना जिल्हा अध्यक्ष राजेश नागरिकर,अ.भा.माळी महासंघ गोंदिया जिला महिला अध्यक्ष गायत्री ईरले‌‌, देविदास गुरनुले, कामेश्वरजी निकोडे,शालीकभाऊ गुरनुले, सदाशिव राऊत, ब्रह्मानंद सोनुले नागपूर,  योगेश गायधने, विलास मेंढे मो-अर्जुनी,दयारामजी पंधरे आदी मान्यवर उपस्थित होते.संचालन डॉं.यशवंत गुरनूले यांनी केले.प्रस्तावना सुदाम गुरनुले यांनी तर आभार विलास निकुरे यांनी मानले.