गोंदिया जिल्हा दुग्ध संघ ६० लाखाच्या तोट्यात?

0
18

गोंदिया,दि.25- शेतकèयांना सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा अनेक शेतकèयांनी सुरू केला. मात्र त्या शेतकèयांची मोठ्या प्रमाणात जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.याबाबत विभागीय उपनिबंधक (नागपूर) व जिल्हाधिकाèयांना तक्रार केली गेली.त्यामध्ये या संस्थेने एका दिवसाकाठी शेतकèयांचे ४० ते ५० हजार रुपये परस्पर गहाळ करीत असल्याचे तक्रारकत्र्यांचे म्हणणे आहे.याचप्रकरणात तक्रारकत्र्यांना दुग्ध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे यांनी तुमचे दूध कोण घेतो,तुमच्यासोबत काहीही होऊ शकते अशा स्वरूपाची धमकी दिल्याने रामनगर पोलिसांनी कलम ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
एकीकडे दुग्धउत्पादक शेतकèयांचे पैसे संघाने थकविल्याचा प्रकार समोर येताच सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्हा दुग्ध संघात मोठा घोळ असल्याचेही समोर येऊ लागले आहे.यामध्ये जिल्हा विभाजनानंतर नफ्यात न येता संस्था तोट्यातच चालली असून अंदाजे ६० लाख रुपयाच्या तोट्यात हा संघ असून गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३० लाख रुपयाच्या घेतलेल्या लिमीटप्रकरणात संघाची मालमत्ता बँकेकडे ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.विशेष म्हणजे ज्यावेळी ३० लाखाची लिमिट देण्यात आली त्याचवेळी संस्था ३६ लाखाच्या तोट्यात होते. आजच्या घडीला हा आकडा ६० लाखाच्यावर जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे असून जीडीसीसी बँक एवढी रक्कम कुठून वसूल करणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे.तर राज्यसरकारच्या दुग्धआयुक्तालयाने जर शासनस्तरावर गोंदिया जिल्हा दुग्धसंघाच्या गेल्या पाच वर्षाच्या आर्थिक हिशोबाचे ऑडिट केल्यास मोठ्याप्रमाणात या संघातील गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राज्यातील पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कार्याचा गवगवा करणारे भाजप सेनेचे सरकार गोंदिया जिल्हा दुग्धसंघातील कामकाजाची व आर्थिक गैरव्यवहाराचे ऑडिट करून अन्यायग्रस्त दुग्धउत्पादक शेतकèयांना न्याय देईल काय याकडे लक्ष लागले आहे.
त्यातच भंडारा जिल्हा दुग्धसंघात कार्यरत असताना शंकर उपासे यांना त्यावेळचे ऑडिटर चौधरी यांनी आर्थिक व्यवहारप्रकरणात दोषी ठरविल्याने भंडारा दुग्धसंघाने नोकरीतून काढून टाकले होते.असे ज्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्या उपासेंना मात्र गोंदिया जिल्हा दुग्धसंघाने कामावर घेतले असून यांच्यावर दरमहा ५० ते ६० हजार रुपये वेतनासह इतर बाबीवर खर्च होत आहे.
गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेअंतर्गत जिल्हा दुग्ध संकलन करणाèया संस्थांची संख्या १५० च्या जवळपास आहे.या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८ हजार शेतकरी जुळले आहेत.या शेतकèयांचे शोषण करण्याचे काम जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्था करीत असल्याची तक्रार ५ एप्रिल रोजी करण्यात आली आहे. ज्या दुधाचे फॅट ३.५ आहे त्या दुधाला शासकीय दर २७ रुपये ५० पैसे आहे. हा दर शासकीय नियमाप्रमाणे द्यायला हवा. परंतु जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने १ डिसेंबर २०१७ पासून एक लिटर दुधामागे ५ रुपये ५० पैसे कमी देऊन फक्त २२ रुपये दराने शेतकèयांना पैसे दिले. म्हणजेच एका लिटर मागे ५ रुपये ५० पैसे कमी दिले आहेत. जिल्ह्यात ८ हजार लिटर दुधाचे संकलन गोंदिया व कोहमारा या दोन संकलन केंद्रावर होते. म्हणजेच एका दिवसाचे शेतकèयांचे ४४ हजार रुपये येथील जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कमी देत आहे. मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. २४ जानेवारी पासून हा प्रकार सुरू असल्याने जानेवारी महिन्याचे ८ दिवस, फेब्रुवारी महिन्याचे २८ दिवस, मार्च महिन्याचे ३१ दिवस व एप्रिल महिन्याचे २० दिवस असे एकूण ८७ दिवसांत गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने शेतकèयांचे ३८ लाख २८ हजार रुपये हडपले आहेत.
या संदर्भात जिल्हाधिकारी व उपनिबंधकांकडे तक्रार केल्यानंतर धमकी दिली जात असल्याचे आनंद दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, मर्या. हरसिंगटोलाचे मन्साराम दसरे, संतराम दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, मर्या. लोहाराचे संचालक परस बसेने,किसान दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, मर्या. सेजगावचे खेमराज राऊत यांचे म्हणणे आहे.तर ज्या काही नेत्यांच्या संस्था बंद आहेत,त्या संस्थाच्या नावावर मध्यप्रदेशातील सालेटेका येथून दूध खरेदी करून तो येथील दूध संघात एका संचालकाच्या मार्फत पोचविला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
जेव्हा की महाराष्ट्रापेक्षा मध्यप्रदेशात शासकीय दुधाचे दर कमी आहेत.त्यातच दुसèया राज्यातील दूध खरेदी करून आणता येत नसतानाही त्यातच महाराष्ट्र सरकारने संघाकडून दिवसाकाठी फक्त ११ हजार २०० लिटर एवढेच दूध खरेदी करण्याचा कोटा ठरवून दिला आहे.हा कोटा पूर्ण करण्यासाठी काही बंद असलेल्या दुग्धसंस्थांना मध्यप्रदेशातील दुधावर जिवंत दाखवून शासनाची फसवणूक केली जात असल्याचीही चर्चा आहे.
भंडारा दुग्ध संघाच्या विभाजनावेळी गोंदिया संघाला दुधाचा १ टँकर देण्यात आलेला होता.त्या टँकरला काही वर्षापूर्वी ८ लाख रुपयांमध्ये खरेदी करण्याची इच्छा एका व्यक्तीने केली होती.परंतु त्यावेळी तो टँकर विक्री करण्यात आला नाही. तो टँकर मात्र आजच्या घडीला बेपत्ता झाला असून तो टँकर कुठे विक्री करण्यात आला qकवा कबाडात देण्यात आल्याचे कुठेही आर्थिक हिशोब नसल्याचेही म्हणणे आहे.तर संघ जेव्हापासून अस्तित्वात आला तेव्हापासून उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये यासाठी बर्फ खरेदी करण्यात येते.त्यामध्येही १५० किलोची लादी दाखविण्यात येत असली तरी वास्तविक तिचे वजन १२० किलोच्या जवळपासच राहत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.१५०किलोची लादी तयार करायला दोन ते तीन दिवस लागत असताना दररोज कशापध्दतीने एवढ्या वजनाची लादी उपलब्ध होतेय यावर काहींनी शंका व्यक्त करीत गोंदिया जिल्हा दुग्ध संघाच्या गेल्या ५ वर्षातील सर्व व्यवहाराचे शासन स्तरावर ऑडिट होण्याची गरज असून यासाठी जळगाव येथील ऑडिटर चौधरी यांची नेमणूक शासनाने करावी अशीही या व्यवसायातील अनेकांचे म्हणणे आहे.
दुधाचे दर शासकीय दरापेक्षा कमी मिळत असल्याची तक्रार संस्थांकडून आली व त्याची उपनिबंधक चौकशी सुरू आहे. गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेला ७९ (अ) प्रमाणे नोटीस बजावून स्पष्टीकरण मागविण्यात आल्याची माहिती भंडारा येथील दुग्ध विकास अधिकारी नीलेश बंड यांचे म्हणणे आहे.