आणखी दोन नक्षल्यांचे मृतदेह सापडले

0
10

पोलीस अधिक्षकांसह चार पोलीस शिपायांचा होणार सत्कार

गडचिरोली,दि.25: नक्षलविरोधी अभियानादरम्यान रविवारी कसनासूर जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या आणखी दोन नक्षल्यांचे मृतदेह आज बुधवारला इंद्रावती नदीत तरंगताना सापडले. मृतदेहाचा काही भाग मगराने खाल्याचे आढळून आले. अजूनही शोधमोहीम सुरू आहे.दरम्यान या घटनेचे वृंताकंन करण्यासाठी नागपूरवरुन आलेल्या एका वृत्तवाहिनीचा कॅमेरामन नदीपात्रात पडतांना बचावल्याचे वृत्त आहे.
कसनासूर चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची संख्या ३३ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता दोन चकमकीतील मृतक नक्षल्यांची संख्या एकूण ३९ झाली आहे. रविवारी भामरागड तालुक्यातील ताडगावपासून सात किमी अंतरावरील कसनासूर जंगलात सी-६० व सीआरपीएफ जवानांच्या वतीने नक्षलविरोधी अभियान सुरू असताना झालेल्या चकमकीत अनेक नक्षलवादी ठार झाले होते. पहिल्या दिवशी पोलीस जवानांनी १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत केले.सोमवारी इंद्रावती नदीत आणखी ११ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. बुधवारी शोधमोहीम राबविली असता, पुन्हा एका महिला नक्षलीचा मृतदेह हाती लागला.

दरम्यान नक्षल्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह जिल्हा पोलिस दलात विविध विभागात कार्यरत चार पोलिस शिपायांना उत्तम कामगिरीबद्दल २०१७ वर्षाकरीता महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. राज्यातील ५७१ पोलिस अधिकारी व कर्मचाºयांना महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.गडचिरोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत पोलिस नाईक श्रीनिवास कंदीकुरवार, पोलिस शौर्य पदक प्राप्त पोलिस शिपाई जितेंद्र मारगाये, गजेंद्र हिचामी व राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत पोलिस शिपाई मधुकर हनुमंतू आचेवार यांना पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.