नागनडोह जंगल परिसरात पोलीस – नक्षल चकमक

0
10

गोंदिया,दि.25 : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्याअंतर्गत नागनडोह जंगल परिसरात आज (दि.२५) पहाटेदरम्यान पोलिस – नक्षल चकमक होऊन काही नक्षली जखमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेला पोलीस सुत्रांनी दुजोरा दिला आहे.लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसात पोलीस – नक्षल चकमकीत ३७ नक्षल ठार झाल्याची घटना घडल्यानंतर नक्षल गोंदिया जिल्ह्यातील रेस्ट झोन असलेल्या परिसरात येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी आज पहाटे नवेगावबांध मार्गाने सी-६० चे पथक नागनडोह जंगल परिसरात शोधमोहिम राबवित असतांना ही चकमक झाली.मात्र अधिक माहिती सविस्तर व अधिकृत मिळू शकली नाही.रात्री उशीरापर्यंत केशोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याचे सुत्रांचे म्हणने होते.याबाबत उद्या गुरुवारला पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ पत्रकारांना माहिती देण्याची शक्यताही सुत्रांनी वर्तविली आहे.