गोंदिया परिमंडळातील २८६ घरे प्रकाशमय

0
8

गोंदिया,दि.२६ : ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने’अंतर्गत महाविरणच्या गोंदिया परिमंडळात येणार्‍या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १0 गावांत मागील आठवड्यात २८६ घरांना वीजजोडणी करून गरजू, गरीब गावकर्‍यांची घरे प्रकाशमय करण्यात आली आहेत. यात गोंदिया जिल्ह्यातील ५९ तर भंडारा जिल्ह्यातील २२७ वीज जोडण्यांचा समावेश आहे.
भारतर% डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत ज्या गावात ८0 टक्केपेक्षा जास्त नागरिक दलित आहेत आणि गरीब कुटुंबातील आहेत अशा गावांतील सर्व घरांचे विद्युतीकरण करण्याची योजना महावितरणकडून आखण्यात आली. संपूर्ण राज्यात ग्राम स्वराज्य योजना १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत राबविल्या जाणार्‍या आहे. राज्यात अशा गावांची संख्या १९२ तर भंडारा जिल्ह्यातील ७ व गोंदिया जिल्ह्यातील ३ गावांचा समोवश सदर योजनेत करण्यात आला होता. गोंदिया परिमंडळ कार्यालयाचे प्रभारी मुख्य अभियंता आणि भंडारा मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी पुढाकार घेउऊन दोन्ही जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवून निर्धारित कालावधीच्या बर्‍याच आधी १0 गावांत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले. यात गोंदिया जिल्ह्यातील घोगरा येथे ६, कुंभारटोली ६, येरानदी ४ तर भंडारा जिल्ह्यातील अशोकनगर येथे १, साबरी ३, गोलेवाडी ७, जांभळी ३, मासलमेटा ६, कन्हाळगाव येथे २७ अनुसूचित जातीच्या ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जमातीच्या ६ आणि इतर वर्गातील ग्राहकांनाही या योजनेअंतर्गत वीजजोडणी देण्यात आली आहे. या योजनेमुळे १0 गावांत ३१ मार्च २0१८ पूर्वी असलेल्या सर्व घरांना वीजजोडणी देण्यात आली आहे. गोंदिया मंडळ कार्यालयाचे प्रभारी अधीक्षक अभियंता ओंकार बारापात्रे यांचेही सहकार्य लाभले.