मुख्य बातम्या:

इंदू मल्होत्रा बनणार सुप्रीम कोर्टात थेट न्यायाधीश

नवी दिल्ली,दि.26(वृत्तसंस्था)-  वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकिल पदावरून थेट न्यायाधीश बनणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत. शुक्रवारी इंदू मल्होत्रा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदी शपथ घेण्याची शक्यता आहे.  इंदू मल्होत्रा यांची न्यायाधीस पदी नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, उत्तराखंड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश असणाऱ्या के.एम.जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांना इंदू यांच्या नियुक्तीबाबत पत्र लिहिणार असल्याची माहिती आहे.

सरन्यायाधीश दिपक मिश्रा अध्यक्षतेखालील कॉलेजियमने वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची न्यायाधीश पदी नियुक्ती करण्याची शिफारस करून इतिहास घडवला आहे. सुप्रीम कोर्टातील याआधीच्या सहा न्यायाधीशपदी असलेल्या महिला हायकोर्टातील वकील होत्या.  ऑगस्ट 2007 मध्ये सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकीलपदी नियुक्ती झालेल्या इंदू मल्होत्रा (वय 61 वर्ष) या दुसऱ्या महिला वकील आहेत. लीला सेठ या सुप्रीम कोर्टातील पहिल्या वरिष्ठ वकील होत्या. 1977 साली त्यांची नियुक्ती झाली होती. नंतर त्या हाय कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.  तब्बल तीन दशकांनी इंदू मल्होत्रा यांची सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकीलपदी निवड झाली.

 

Share