मुख्य बातम्या:
गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात# #रेल्वे गाडीतून दारूची तस्करी करणारे गडचिरोलीचे तीन युवक ताब्यात# #संविधानाच्या प्रती जाळण्यामागे भाजपाचे प्लॉनिंग;पत्रपरिषदेत जयंत पाटील यांचा आरोप# #कार्यकर्त्यांनी बुथ कमेटी निर्मितीवर भर द्यावे - जयंत पाटील# #अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे व जमिनीचे स्वतंत्र सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या# #गांगुलपारा झरने के पास गोंदिया के तीन युवकों का मिला शव, एक की तलाश जारी # #तायक्वांडो स्पर्धेत देवरीच्या योजनला स्वर्णपदक# #ओबीसींच्या समस्या निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करा# #पालकमंत्र्यांच्या हस्ते शिक्षक वैद्य यांचा सत्कार# #तालुक्यातील ४ ठिकाणी नळयोजनेचे भूमिपूजन

बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन द्यावे – राज्यपाल

तीन विद्यापीठांमध्ये बांबूपासून वस्तूनिर्मितीची प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याचे निर्देश
मुंबई,दि.26 : 
बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन देण्यात यावे, त्यादृष्टीने राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे बांबूपासून वस्तुनिर्मितीची प्रशिक्षण केंद्र सुरु करावीत, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले. राजभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह या तिनही विद्यापीठाचे कुलगुरू, वन विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
बांबूआधारित उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी वरील तीनही विद्यापीठांमध्ये येत्या तीन महिन्यात ही केंद्रे सुरु केली जावीत असे सांगून राज्यपाल म्हणाले की, स्टार्ट अप पॉलिसीअंतर्गत बांबू आधारित रोजगार संधीची मोठ्या प्रमाणात उपलब्धता होऊ शकते. पंतप्रधानांचे देखील हेच स्वप्न आहे. त्यामुळे बांबूपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचा बाजारपेठेतील मागणी आधारित उपयोग कसा करता येऊ शकेल, याचा सविस्तर अभ्यास केला जावा. यासाठी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ, चिचपल्ली यांच्याशी चर्चा केली जावी. विद्यापीठांनी बांबू लागवडीत पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
बांबूमध्ये प्रचंड रोजगारसंधी – सुधीर मुनगंटीवार
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबूमध्ये प्रचंड रोजगार संधी दडल्या असल्याचे यावेळी सांगितले. तिनही केंद्रे सुरु करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही ते म्हणाले. बांबूचे मूल्यवर्धन करून बांबूपासून राखी, बांबूचे दागिने, बांबू घरे, बांबू बाथरूम, स्वंयपाक घरातील छोट्या मोठ्या वस्तूंची निर्मिती, हस्तकौशल्याच्या वस्तू, बास्केट, चटई, बांबू पल्पपासून कागद निर्मिती तसेच वस्त्र निर्मिती, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती यासारख्या अनेक गोष्टी तयार होतात. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीत बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, संपूर्ण बांबू केंद्र-मेळघाट, बांबू विकास मंडळ यांनी सादरीकरण केले. पंजाब नॅशनल बँकेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी देशभरात ११ प्रशिक्षण केंद्र आतापर्यंत सुरु करण्यात आली आहेत. त्याचेही आजच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.

Share