नागपूर विधानभवनावर फडकणार ‘विदर्भ झेंडा’

0
11

चंद्रपूर ,दि.27ः-मागील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भाचे आश्‍वासन दिले होते. परंतु, ते अद्याप पूर्णझालेले नाही. दरम्यान विदर्भराज्य आंदोलन समितीने लढा सुरू ठेवला असून हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहचले आहे. महाराष्ट्राची निर्मिती करताना जी आश्‍वासन दिली गेली. ती पण पाळण्यात आली नाही. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी १ मे ला विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी दिली.
यावेळी विदर्भवादी नेते श्रीनिवास खांदेवाले, प्रभाकर दिवे, डॉ. रमेशकुमार,किशोर पोतनवार, अनिल दिकोंडावार,गोपी मिर्शा, वसंत चांदेकर, कुमारजुनमलवार, दिवाकर मानुसमारे, किशोर दहेकर, अँड. गोविंद भेंडारकर, डॉ. रमा देवाळे,रंजना भामरडे, अंकुश वाघमारे, हिराचंद बोरकुटे, प्रा. अनिल ठाकुरवार, नथमल सोनी यांची उपस्थिती होती.
अँड. चटप म्हणाले, वेगळय़ा विदर्भासाठी जिल्हा बैठकांचा दौरा सुरू आहे. २0१९ च्या निवडणुकीच्या अगोदर भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्याचे दिलेले आश्‍वासन पूर्णकरावे,शेतकर्‍यांना संपूर्ण कर्ज मुक्ती व उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के मुनाफा ऐवढे हमी भाव देऊ ,शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू, आदी आश्‍वासन शासनानेपूर्ण केले पाहिजे.
स्वतंत्र विदर्भाचे आश्‍वासन व शेतकर्‍यांच्या प्रश्नावरच विदर्भातून भाजपाचे ४४ आमदार निवडून आले. त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपाची सत्ता बसली. महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यामध्येविदर्भाच्या जनतेने भाजपाला प्रचंड साथ दिली. परंतु भाजपा सरकार ने व भाजपाच्या नेत्यांनी मात्र विदर्भाच्या जनतेला दिलेल्या विदर्भ राज्याचे आश्‍वासन पाळले नाही,असा आरोप चटप यांनी केला. विदर्भातील जनता भाजपा पासून नाराज झाली असून निवडणुकीत मात्र भाजपाच्या मतपेटीवर त्याचा मोठा परिणाम होणार. त्यामुळे या वेगळय़ा विदर्भाचे महत्व लक्षात घेऊन विदर्भवासियांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
विदर्भात शेतकर्‍यांच्या प्रचंड आत्महत्या वाढल्या आहे. भाजपा सरकार मात्र शेतकर्‍यांना मरण्यासाठी सरणावर नेऊन सोडत आहे. भाजपाच्या सरकार ने जे निवडणुकीच्या वेळेस आश्‍वासन दिले होते. त्यापैकी एकही आश्‍वासन पाळले नाही. त्यामुळे विदर्भवादी, शेतकरी, बेरोजगार, व्यापार सर्वच क्षेत्रातुन नराजीच्या सूर या सरकार विरोधात निघत आहे. भाजपा सरकारने निवडणूकी अगोदर स्वतंत्र विदर्भाची घोषण करून विदर्भ निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करावी अशीही मागणी त्यांनी केली.येत्या १ मे ला यशवंत स्टेडियम नागपूर येथून दु.१२ वाजता विदर्भ मार्चनिघेल व १ वाजेपर्यंत हा मार्चविधान भवनावर पोहचून तेथे ‘विदर्भाचा झेंडा’ लावण्याचे आंदोलन होईल. विदर्भातील जनतेने मोठया संख्येने या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.