पोलीस अधिक्षकांसमोर जहाल महिला नक्षलीचे आत्मसमर्पण

0
5

गडचिरोली,दि.2 : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. आतापर्यंत वरिष्ठ नक्षल सदस्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस दलाने त्यांचे पुनर्वसन घडवून आणल्यामुळे नुकतेच महाराष्ट्र शासनातर्फे ०४ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेली महिला नक्षली ज्योती उर्फ रवीना जोगा पूडयामी (२६) रा. शिराकुंटा ता. भोपालपट्ट्नम जि. बीजपुर (छत्तीसगड) हिने आज २ मे रोजी पोलीस अधिक्षक यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलांनी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करत आहेत. आतापर्यंत वरिष्ठ नक्षल सदस्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने व पोलीस दलाने त्यांचे पुनर्वसन घडवून आणल्यामुळे नुकतेच महाराष्ट्र शासनातर्फे एकूण ०४ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या महिला नक्षल ज्योती उर्फ रविना जोगा पूडयामी वय २६ वर्ष रा. शिराकुंटा पोस्टे मदेड ता. भोपालपट्ट्नम जि. बिजापुर छत्तीसगड या महिला नक्षलने डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक गडचिरोली यांच्या समोर आत्मसमर्पण केले. ती नोव्हेंबर २००९ मध्ये भोपालपट्ट्नम दलम मध्ये भरती झाली. तेव्हापासून नक्षली कारवायात तिचा सक्रिय सहभाग होता. सध्या ती तेलंगणा भागात कार्यरत असलेल्या मंगी दलम मध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत होती.
पोलीस विभागाने आत्मसमर्पण करण्याचे केलेले आवाहन व शासनाची आत्मसमर्पण योजना आणि पोलीस दलाने भूखंड, आर्थिक मदत, रोजगाराची उपलब्धता, नसबंदी रिओपनिंग यांसारख्या माध्यमातून आत्मसमर्पिताचे पुनर्वसन घडवून आणल्याने सन २०१८ या वर्षात ०९ नक्षलवाद्यांनी पोलीस अधिक्षकांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर इतर नक्षलवाद्यांनी हिंसक मार्ग सोडून मूळ प्रवाहात परत यावे व आत्मसमर्पण करावे असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी केले आहे.