विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचीही आघाडी

0
13

मुंबई,दि.03: आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. येत्या 21 मे रोजी विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे.आज गुरूवारी झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला मान्य केला. त्यानुसार अमरावती, परभणी-हिंगोली व चंद्रपूर या जागांवर काँग्रेस लढेल. तर लातूर,  कोकण आणि नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. तत्पूर्वी कालच शिवसेना आणि भाजप यांनीदेखील 50-50 चा फॉर्म्युला मान्य करत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य विधानपरिषदेतून मे आणि जून अखेर निवृत्त होत असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ३१ मे २०१८ रोजी संपतेय. राष्ट्रवादीचे जयंत जाधव (नाशिक) आणि बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली), काँग्रेसचे दिलीप देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड) आणि भाजपाचे प्रवीण पोटे (अमरावती), मितेश भांगडिया (चंद्रपूर) या सदस्यांची मुदत २१ जून रोजी मुदत संपत आहे. त्यांच्या जागी नवे सहा प्रतिनिधी विधानसभेवर जाणार आहेत