जीईएस सोशल फोरमच्यावतीने शिबिराचे आयोजन

0
7

गोंदिया,दि.04ः- येथील जी.ई.एस.सोशल फोरम आणि मनोरहरभाई पटेल अकादमीच्यावतीने तालुक्यातील दासगाव येथील जी.ई.एस.हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे जात व अधिवास प्रमाणपत्र तयार करण्याकरीता शिबिराचे आयोजन गुरुवारला करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन माजी आमदार व गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डाॅ. मृत्युंजय सिंह, डॉ. आलोक व्दिवेदी, प्राचार्य विनायक कापगते उपस्थित होते.शेकडो विद्यार्थी व पालक या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिबिरात सहभागी झाले होते. तसेच १५० विद्यार्थ्यांनी जाती व अधिवास प्रमाणपत्रांसाठी आवश्यकसंपूर्ण कागदपत्रांसहीत या शिबिरात नोंदणी केली.