मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

१० मे रोजी एमएचटी-सीईटी परीक्षा  १४ केंद्रावर ५ हजार ८० विद्यार्थी

 ६०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त
भंडारा, दि. ८ : महाराष्ट्र कॉमन एन्ट्रस टेस्ट एमएचटी-सीईटी २०१८ येत्या १० मे २०१८ रोजी होत असून भंडारा येथील १४ केंद्रावर ५ हजार ८० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्णतयारी केली आहे. शहरातील १४ केंद्रावर ही परीक्षा होणार असून परीक्षेसाठी ६०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. संबंधित परीक्षेचे २ टप्प्यामध्ये प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणादरम्यान परीक्षा व्यवस्थेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना परीक्षेबाबत करावयाची कामे तसेच अनुपालनाची माहिती देण्यात आली.
उन्हाळयाचे दिवस असल्याने केंद्रावर पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच तीन आरोग्य पथक परीक्षेच्या दिवशी कार्यरत राहणार आहे. गरज पडल्यास रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे. प्रत्येक केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून केंद्रनिहाय पुरुष व महिला पोलिस कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून परीक्षा विभागाने राज्य परिवहन महामंडळाला कळविले आहे. तसेच ज्या शाळेकडे स्वत:ची बस व्यवस्था असेल त्यांना परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांची ने-आण करण्याकरीता सांगण्यात आले आहे. परीक्षा कालावधीत अखंडित वीजपुरवठा ठेवण्याबाबत महावितरणला सूचित केले आहे.
परीक्षा केंद्रापासून १०० मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Share