पालकमंत्र्यांच्या दत्तक गावातून जाणार्या रस्त्यावर खड्डे

0
8

सडक अर्जुनी,दि.09ः – तालुक्यातील आमदार दत्तक गाव कणेरी /राम येथे अनेक विकासात्मक कामे झाली असली तरी आजही या गावातून गोंडउमरी / राका फाट्याकडे जाणारा अंदाजे 300 मीटर रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत.सदर रस्ता डाबंरीकरणाचा असला तरी खड्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.या खड्यावर मुरुम घालून लिपापोती करण्याचा प्रकार नेहमीच होत असून पालकमंत्री यानी घेतलेल्या दत्तक गावातील रस्ता आहे हे विशेष. पाऊस आला की त्या खड्यामध्ये पाणी साचतो आणि वाहनचालकांना कळत नाही अशावेळी अनेकदा खड्यात वाहनचालक पडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे यामार्गाची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.