मुख्य बातम्या:

टेम्पोला टँकरची धडक; 11 ठार, 25 जखमी

नांदेड,दि.12ः- मुखेड-उदगीर रस्त्यावर जांब गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड घेून जाणारा टेम्पो आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातात एकूण ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण गंभीर जखमी आहेत.. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असूनअपघात झालेल्या टेम्पोवर लावलेल्या बॅनर वरून हा विवाह सोहळा नारंगे व टीमेकर परिवाराचा होता आज शनिवारी विवाह असल्याचे समजते.जखमींना आजूबाजूच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामध्ये मृत पावलेले सर्व जण मृत सर्व खरोसा (ता. औसा) येथील आहेत. लातूर – मुखेड रस्त्यावर जांब (ता. मुखेड, जि. नांदेड) या ठिकाणी सकाळी साडे नऊ वाजता हा अपघात घडला.

Share