गोंदिया पोलीस अधिक्षकांचा पत्नीसह अवयवदानाचा संकल्प

0
10

गोंदिया,दि.12ः- महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेनिमित्त सध्या जागतिक थॅलेसॅमिया दिनानिमित्त महारक्तदान व अवयवदानसाटी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील व त्यांची पत्नी निलिमा पाटील भुजबळ या दोघांनी मरणोपरांत अवयवदानाचा संकल्प केला आहे.अवयव दानाचा संकल्प करत त्यांनी लागलीच यावेळी अवयक दानाचा अर्जसुध्दा भरून दिला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.वी.पी.रूखमोडे यांनी अवयव दानदाते दिलीप पाटील भुजबळ व निलीमा पाटील भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी वरिष्ठ शल्यचिकीत्सक डॉ.राजेंद्र जैन, इंजी.डी.यु.रहांगडाले उपस्थित होते. निलीमा पाटील भुजबळ यांनी अवयक दानाचा अर्ज भरून डॉ.रूखमोडे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी निलीमा भुजबळ म्हणाल्या कि, जीते जी रक्तदान व जाते -जाते नेत्रदान, प्रत्येकाने नेत्रदानाचे संकल्पपत्र भरावे, माझा रक्तगट ओ पॉझीटिव्ह आहे व मी नियमित रक्तदान करते. थॅलेसिमिया बालकांना सुदृढ युवकांनी दत्तक घेऊन त्यांना जीवनदान द्यावे. अवयवदानाबाबत सामान्य जनतेत जनजागरण करण्याची प्रेरणा निलीमा पाटील भुजबळ यांच्याकडून नेहमीच मिळत आली असल्याचे दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले.