मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भंडारा,,दि.१४ः-: घरघुती सबंध जोपासताना घरात कुणीही नसल्याचे पाहून व जीवे मारण्याची धमकी देऊन एका वासनांध विकृती ने झपाटलेल्या शिक्षकाने चक्क तेरा वर्षीय दलित मुलींवर दोनदा जबरी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे सदर प्रकरणी पीडित दलित मुलीच्या तक्रारीवरून तब्बल एका महिन्यानंतर त्या वासनांध  शिक्षका विरोधात लाखांदुर पोलीसांनी गुन्हा नोंद नोंदवुन आरोपीला अटक केली आहे .अनिल जगण राऊत (४५) रा. लाखांदूर असे वासनांध विकृतीने झपाटलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पोलीस सूत्रा नुसार  आरोपी शिक्षक अनिल जगण राऊत याचे घराशेजारीलच अन्य एका शिक्षकांशी घरगुती सबंध होते सदर संबंधामुळे आरोपी शिक्षकासह अन्य शिक्षकाचे देखील परस्परांच्या घरी येणे-जाणे होते मात्र आरोपी शिक्षकात  वासनांध विकृती जागृत झाल्याने घरघुती संबंधातील अन्य दलित शिक्षकाच्या मुलीवर दोनदा अत्याचार केल्याची माहिती आहे.

महिनाभरापूर्वी ही घटना घडली असताना पीडित मुलीच्या कुटूंबीयांनी महिनाभरानंतर १२ मे रोजी लाखांदूर पोलिसांत तक्रार दाखल केली. लाखांदूर पोलिसांनी तक्रारिवरून आरोपी शिक्षकाविरोधात भादवी नुसार ४५१, ३७६(१),बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२, अन्वये सहकलम ४/८/१२व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार ३(२)(५)(अ) नुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.संबंधित शिक्षकाला लाखांदूर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी टिकस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share