नाकाबंदी दरम्यान वाहनांवर कारवाई

0
12

भंडारा,,दि.१४ः-: जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहु यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ मे रोजी  संपुर्ण जिल्हात पोलीस स्टेशन स्तरावर नाकाबंदी करून मोठया प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करून त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यात आली.

भंडारा पोलीस स्टेशन, वानीषा, आरसीपी पथक यांनी संयुक्तरित्या नागपुर नाका येथे नाकाबंदी करून चारचाकी व मोटार सायकलसह एकुण ४७ वाहनांची तपासणी केली. त्यात  मोटार वाहन कायद्यान्वये २ केसेस व इतर १९ केसेस व १ गुन्हा नोंद करण्यात आलो.  लाखांदुर पोलीस स्टेशन अंतर्गत सोनी येथे  नाकाबंदी  नाकाबंदी दरम्यान ३० चारचाकी व १२  दुचाकी  वाहनांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी ४ वाहनावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली.  लाखनी पोलीसांनी लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समीती समोर नाकाबंदी करून ४२ वाहनांची तपासणी केली. त्यापैकी ६६/१९२ ची १  व इतर ७ वाहनांवर कारवाई करण्यात आलीा.  साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत  टोल नाका येथे नाकाबंदी करुन कलम १६७/१९२ अंतर्गत १ व इतर  मोटारवाहन कायद्याअंतर्गत ८ केसेस करण्यात आले.  मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाबंदी दरम्यान  मोहाडी पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी करून २५ चारचाकी  ,१७  दुचाकी  वाहने तसचे मोटार वाहन कायदा कलम २२९/१७७, १०८/१७७ प्रमाणे प्रत्येकी १ केस करुन ८००/-रु. चा दंड व अवैध पवासी वाहतुक कलम ६६/१९२ प्रमाणे एकाकडुन २०००/-रु. दंड वसुल करण्यात आला. यासह अन्य   ४ वाहनावर मोटारवाहन कायद्या प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन १ वाहनावर ६६/१९२ मोटारवाहन कायद्या प्रमाणे कार्यवाही करण्यात आली.