मुख्य बातम्या:
पंचायत समिती कार्यालयावरीव तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न# #जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द- पालकमंत्री बडोले# #वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ# #शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री संजय राठोड# #क्षत्रिय पोवार समाज संघ पुणेद्वारा व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम १६ सितंबर को# #दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

नक्षलविरोधी मोहिमेच्या दिमतीला लवकरच आणखी एक हेलिकॉप्टर

गडचिरोली,दि.१४ः–गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अनेकवेळा नक्षल चकमक होतात. त्यामुळे जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानासाठी राज्य सरकार आणखी एक हेलिकॉप्टरची खरेदी करणार असल्याने जिल्ह्यातील नक्षविरोधी मोहिमेला आणखी बळ मिळणार आहे.
गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमा आंध्रप्रदेश व छत्तीसगडला लागून असून या सीमावर्ती भागात मोठय़ा प्रमाणात घनदाट जंगले आहेत. त्यामुळे सीमेला लागून असलेल्या दुर्गम भागात अनेकवेळा पोलिस – नक्षल चकमकी घडून येतात. या चकमकीत अनेकवेळा पोलिस जवानही जखमी होतात. या जवानांना तत्काळ उपचारासाठी नागपुरात आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर आवश्यक ठरावे म्हणून राज्य सरकारने एअरबस एच -१४५ हेलिकॉप्टर खरेदी करणाचा निर्णय घेतला आहे. हे हेलिकॉप्टर आल्यानंतर जिल्ह्यातील नक्षलविरोधी चळवळीला आणखी बळ मिळेल, असा विश्‍वास गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकूश शिंदे यांनी व्यक्त केला आहे. विशेष करून जखमी जवानांवर तातडीने उपचार होऊन त्यांचा जीव वाचविण्यास मदत होईल.
मूळ फ्रेंच असलेल्या एअरबस कंपनीच्या र्जमनीतील डोनाऊवर्थ प्लॅंटमधून सदर हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहे. ७ सप्टेंबर २0१७ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सदर हेलिकॉप्टर खरेदिला मान्यता मिळाली होती. त्यानंतर २४ जानेवारी २0१८ ला जागतिक निविदा काढण्यात आली होती. सर्व अहवाल तपासून शक्ती प्रदत्त समितीने एअरबस एच-१४५ हे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. भारतीय चलनात हेलिकॉप्टरची किंमती ७२ कोटी ४३ लाख इतकी आहे. हे हेलिकॉप्टर नागपूर येथे राहणार असून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानात वापरले जाणार आहे.
हेलिकॉप्टरच्या एकूण किंमतीपैकी १४ कोटी ४९ लाख रुपये आगाऊ म्हणून देण्यात येणार आहे. तर पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यात उर्वरित ५७ कोटी ९४ लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. या हेलिकॉप्टरमध्ये साधारणत: दोन पायलट आणि ८ प्रवासी आणि खूप आणीबाणीच्या परिस्थितीत दाटीवाटीने १0 प्रवाशांची ने-आण करता येणार आहे. या बहुउद्देशीय हेलिकॉप्टरमध्ये वैद्यकीय उपचाराची साधने लावण्यात येणार आहेत.

Share