मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

निवडणूक निरिक्षकांनी घेतला लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

भंडारा,दि. १४ :- भंडारा गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीमध्ये प्रथमच ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. याबाबत मतदारांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विशेष मतदार जागृती मोहीम राबवावी. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था, रोख व मद्य वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या सभा बैठकीचे रेकॉर्डिंग करण्याच्या सूचना निवडणूक निरिक्षकानी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा निवडणूक निरिक्षक यांनी घेतला.
यावेळी निवडणूक निरिक्षक एन. बी. उपाध्याय, तेजप्रताप सिंग फुल्का, शफु-उल हक, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक विनिता साहू, डॉ. दिलीप भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आचार संहिता, मतदार याद्या प्रसिध्द करणे निवडणूक साहित्य छपाई, मतदार जागृती कार्यक्रम, उमेदवारांचा खर्च, राजकीय पक्षांचा खर्च, वाहन परवाने, कायदा व सुव्यवस्था, नाकाबंदी, मद्य व रोख वाहतूकीला आळा आणि मतदानाची तयारी आदी विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रत्येक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे तयारीचा आढावा सादर केला.
सर्व राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या सभा आणि कॉर्नर सभाचे चित्रीकरण करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. व्हिडिओ पथक व भरारी पथकांना सक्रीय ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विविध मार्गाने येणाऱ्या मद्य वाहतूकीवर उत्पादन शुल्क विभागाने पायबंद घालावा, असे निर्देश देण्यात आले. निवडणूकीच्या निमित्ताने इतर जिल्हयातून येणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यात यावी. संशयीत आढळल्यास तात्काळ तपासणी करावी. परवानाधारक शस्त्र तातडीने जमा करण्यात यावे.
या निवडणूकीत प्रथमच व्हिव्हिपॅटचा उपयोग होत असून या विषयी लोकांना माहिती व्हावी म्हणून जागृती अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार जागृती व मतदान वाढविणे यासाठी माहिती, शिक्षण व संवाद मोहिम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात यावी. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या कामावर कार्यरत मजूरांना सुध्दा मतदानाचे महत्व समजावून सांगावे, असे सांगण्यात आले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात.
यावेळी पोलीस अधिक्षक विनीता साहू व पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ यांनी कायदा व सुव्यवस्थेचे सादरीकरण केले. मतदान व मतमोजणीसाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त आराखडा तयार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. आचार संहिता भंगाची तक्रार प्राप्त होताच तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. विविध ठिकाणी चेक पोस्ट स्थापन करण्यात आले असून रोख वाहतूक व मद्य वाहतुकीवर पोलीस विभागाची करडी नजर असल्याचे त्यांनी सांगितले.

Share