मुख्य बातम्या:
खजरी/डोंगरगांव येथील आदिवासी विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात# #मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी-ऊर्जामंत्री# #एक शाम राष्ट्र के नाम' कवि संमेलन आज - भाजयुमोचे आयोजन# #तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात# #अर्जुनी मोर व साकोली पं.स.च्या नव्या इमारत बांधकामाला मंजुरी# #सिरोंचा येथील युवकांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड# #संघी टाॅपर्स अवॉर्ड समारोह ४ फेब्रुवारीला# #समाजाच्या प्रगतीसाठी संघठीत होणे गरजेचे : खनिज मंत्री जायसवाल# #स्वच्छ शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन पुरस्कार मिळावा# #आर्थिक लाभासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी,शासनाची दिशाभूल-राकेश ठाकुर

भाजपचा संविधानविरोधी अजेंडा यशस्वी होऊ देणार नाही

भंडारा,दि.15 : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार संविधानविरोधी असल्याचे चित्र आता समोर येत आहे. २०१९ मध्ये सत्तेत आल्यास संविधान बदलविण्याचा भाजपचा अजेंडा आहे. मात्र भाजपाचे हे प्रयत्न कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा ईशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत दिला.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, राज्यातील सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरवशावर टिकून आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली असती तर जार्इंट किलर ठरले असते. मात्र काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडली. राष्ट्रवादीने कमकुवत उमेदवार देऊन भाजपचा पर्यायाने नरेंद्र मोदी यांचा विजय सोपा केला आहे.
नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार असते आम्ही आपला उमेदवार रिंगणात नसता. आता भाजप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने पटोलेंचा राजकीय गेम करीत आहे. आपला पक्ष राष्ट्रवादीला कधीही पाठिंबा देणार नाही. येत्या निवडणुकीत आपण कुणासोबत या प्रश्नावर ते म्हणाले, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नसली तरच आपण पाठिंबा देऊ, असेही स्पष्ट केले. सर्वच राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष संपले पाहिजे, असे वाटत असते. परंतु आज वेगळी परिस्थिती आहे. राष्ट्रीय पक्षावर लोकांचा भरवसा राहिलेला नाही. या पोटनिवडणुकीत आपल्या उमेदवाराची भाजपशी लढत राहील, असेही त्यांनी सांगितले.
इंदिरा गांधींच्या काळात अघोषित आणीबाणी होती. मोदी सरकारने घोषित करून आणीबाणीची परिस्थिती आणली आहे. आता संघटित मतदार हा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या २० मे रोजी पंढरपूर येथे होणाºया धनगर समाजाच्या संमेलनातून वेगळ्या समिकरणाची नांदी दिसून येईल, असे स्पष्ट केले. पत्रपरिषदेला भारिपचे उमेदवार अ‍ॅड. लटारी मडावी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष महेश भारतीय उपस्थित होते.

Share