दुष्काळामुळे युवकांनी ढकलले पुढे लग्न

0
13

देवरी,दि.15ः-दोन-तीन वर्षांपासून गावात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या मुला-मुलींचे लग्न कसे करावे, असा प्रश्न तालुक्यातील राजमडोंगरी येथील शेतकर्‍यांना पडला आहे. गावातील सात मुलांचे लग्न हलाखीच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. सामूहिक विवाह सोहळासुध्दा आयोजित करता आली नाही. दरवर्षी लग्नसोहळ्याची परंपरा कायम राहावी व गाव उजवावे, यासाठी त्यांनी गावात चक्क बाहुला- बाहुलीचे लग्न लावले.
२0१५-१६ मध्ये आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात दुष्काळ पडला होता.त्यावेळी येथील शेतकर्‍यांनी धानाचे एकही पीक घेतले नाही. त्यातच क्षेत्राच्या लोकप्रतिनिधीनी आम्ही तुमचे वैष्ठवारी आहोत, असे दाखवून त्यांना दुष्काळनिधी सात दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा हाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, तसे झाले नाही. यात फसवणूक झाल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आह. २0१७-१८ या वर्षात पुन्हा दुष्काळ पडला. वारंवार पडणार्‍या दुष्काळामुळे येथील शेतकरी व शेतमजूर आर्थिकदृष्टया हताश झले आहेत. त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करण्यात आली नाही. यामुळे तालुक्यातील नकटी ग्रामपंचायतीअंतर्गत येणार्‍या राजडोंगरी या गावातील शेतकर्‍यांनी आपल्या सात मुलाचे लग्न जोडूनसुध्दा विवाहसोहळा आयोजित केला नाही. तीन वषार्पासून गावात दुष्काळ निर्माण झाला आहे. शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नसल्याने आपल्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
तरीदेखील दरवर्षी गावातील वर-वधूंचे लग्न ठरवून सामूहिक विवाह सोहळ्यात पार पाडण्यात येतात. यावर्षी गावातील सात तरुणांचे लग्न जोडण्यात आले. लग्नाची तयारी करावी म्हणून सर्व कामाला लागले. मात्र, परिस्थिती नसल्याने लग्न कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला. सामूहिक विवाहसोहळा आयोजित करून लग्न उरकावे, म्हणून नागरिक प्रयत्नरत होते. परंतु, त्याकरिता लागणारे पैसे देखील जवळ नसल्याने नाइलाजाने लग्न पुढे ढकलण्यात आले