कर्नाटक नाट्यानंतर 4 राज्यात काँग्रेस-राजदची मागणी

0
9

नवी दिल्ली,दि.17(वृत्तसंस्था) – कर्नाटकमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष (104) ठरल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आणि गुरुवारी सकाळी त्यांचा शपथविधीही उरकण्यात आला. एकटे येदियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल वजूभाई वाला यांनी दिली. त्यानंतर देशातील राजकारण तापले आहे. आता काँग्रेसने गोवा, मणिपूर, मिझाराम आणि राष्ट्रीय जनता दलाने बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. त्यांनी शुक्रवारी राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे. हे दोन्ही पक्ष या राज्यांमध्ये सर्वाधिक जागा असलेले पक्ष आहेत. मात्र भाजप-एनडीएने येथे सरकार स्थापन केले आहे. काँग्रेस आणि राजदचे म्हणणे आहे की कर्नाटकचाच न्याय आम्हालाही लावावा आणि राज्यपालांनी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी तर बिहार सरकार बर्खास्त करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी शुक्रवारी ते धरणे आंदोलन करणार आहेत.

गोव्यातील काँग्रेस नेते यतीश नाइक म्हणाले, ‘2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. आम्ही सर्वात मोठा पक्ष होतो. तरीही राज्यपालांनी 13 जागा असलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले. कर्नाटकात मात्र राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण दिले. त्यामुळे आमची मागणी आहे की गोव्यातही राज्यपालांनी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावे.’ शुक्रवारी गोव्याचे आमदार राज्यपालांची भेट घेणार असल्याचे काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्ला कुमार यांनी म्हटले आहे.

गोवा विधानसभा

एकूण जागा : 40

बहुमत: 21

पक्ष जागा
काँग्रेस 17
भाजपा 13
इतर 07
अपक्ष 03

बिहारमध्ये राजद 80 जागांसह सर्वात मोठा पक्ष
राजद नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे, की कर्नाटकमध्ये लोकशाही हत्या झाली आहे. त्याविरोधात शुक्रवारी आम्ही धरणे देणार आहोत. बिहार सरकार बर्खास्त करण्याचीही मागणी राज्यपालांकडे केली जाणार आहे. कर्नाटक प्रमाणेच आम्हालाही सरकार स्थापन करण्याची संधी दिली पाहिजे. त्यासाठी राज्यपालांची भेट घेणार आहोत.बिहार निवडणुकीत राजद, जदयू आणि काँग्रेस यांची महाआघाडी होती. या आघाडीला 178 जागा होत्या. 80 जागांसह राजद सर्वात मोठा पक्ष ठरला होता. जदयूला 71 जागा होत्या. त्यांचे नेते नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. तर कांग्रेसला 27 जागा मिळाल्या होत्या.  बिहारमध्ये नितीशकुमार यांनी 26 जुलै 2017 रोजी तेजस्वी यादव यांना राजीनामा देण्यास सांगितला. त्यांनी नकार दिल्यानंतर नितीश यांनी स्वतः राजीनामा दिला आणि त्यानंतर भाजप-जदयू युती करत सरकार स्थापन केले होते.

बिहार विधानसभा सध्याची स्थिती

एकून जागा : 243

बहुमत: 122

पक्ष जागा
राजद 80
जदयू 71
भाजपा 53
काँग्रेस 27
अपक्ष 04
इतर 08