बळीराजा पार्टिने जाहिर केला रयतेचा जाहिरनामा;नंदलाल काडगायें रिंगणात

0
45

गोंदिया,दि.२२ः- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच जोम आला असून ओबीसी,बहुजन शेतकरी,शेतमजुरांच्या समस्यांना घेऊन पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या बळीराजा पार्टीने रयतेचा जाहिरनामा जाहिर करुन आघाडी घेतली आहे.बळीराजा पार्टीच्यावतीने शेतकरी हक्कासाठी सातत्याने लाखनी,लाखांदूर परिसरात लढा देणारे,संगणक ऑपरेटरांच्या हक्कासाठी लढा देणारा ओबीसी समाजातील युवा चेहरा नंदलाल दिक्षीत काडगाये यांना रिंगणात उतरविले आहे.नंदलाल काडगायेंनी आपल्या प्रचाराला सुरवात केली असून बहुजन महापुरुषांच्या आदर्श व राज्यघटनेच्या सरंक्षणाकरीता आपण संसदेत आवाज उठविणार असल्याचे जाहिर करीत ओबीसींची जातनिहाय जनगणना हा आपला मुख्य उद्देश असल्याचे विचार प्रचारसभामधून केले आहे.
एकमेव बळीराजा पार्टी अशी आहे की ज्यांनी ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्याला प्राधान्य दिले आहे.रयतेच्या जाहिरनाम्यात जातीनिहाय जनगणना, शेतीला उद्योगााचा दर्जा, कंत्राटी पद्धत बंद करुन स्थापी पदे निर्माण करने, रोजगार सेवकांना मासिक मानधन देणे, ओबीसी, एससी, एसटी, धार्मिक अल्पसंख्याकांच्या न्याय हक्क व अधिकारांचे संविधानिक संरक्षण करने, भूमीपुत्राना अदानी, भेल, लॉयड स्ट्रिल, अशोक लेलँड इत्यादी कंपन्यात रोजगाराला प्राधान्य देणे, नेते पक्ष बदलतात तर मतदारांनी पक्ष बदलण्यांसाठी प्रबोधन करने, भंडारा-गोंदिया जिल्हा म्हणजे तलावांचा जिल्हा म्हणून मिटलेली ओळख मिळवून देणे, मुकुंदराजाचे ‘विवेकqसधूङ्क वैनगंगेची ओळख साहित्यातून निर्माण करने, पवनी हे सर्व धर्मीयांचे प्राचीन तिर्थ क्षेत्राला पर्यटनाचा दर्जा मिळवून देणे, संसदेत स्वतंत्र विदर्भाचा ठराव आणने, गाव, शहर तेथे वॉटर एटीएम सुरु करने, कृषी व आधारित उद्योग स्थापने, राजकीय अनास्थेमुळे रखडलेले भेल प्रकल्प त्वरीत सुरु करुन बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, भंडारा-गोंदिया जिल्हा लोडशेडींग मुक्त करने, शेतकèयांना खोटे वीज बील देयक पाठविणाèयांना कायद्याने दंडीत करने, ‘मनेरगाङ्क अंतर्गत शेतीला लागणारे शेतमजूर पुरविणे, लोकसभा क्षेत्रात कृषी माल साठविण्यासाठी वेअर हाऊस निर्मान करने, परमपुज्य बाबा जुमदेवजी यांच्या कार्याचे साहित्य प्रकाशित करने, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मल्टीपरपज स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करने, नवेगावबांध, नागझिरा व्याघ्र प्रकल्पांना सुरक्षा qभत उभारुन शेतीपिकांची नासाडी व जिवीत हानी टाळणे, भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करने, जंगली प्राण्यासाठी जंगलात पाणवठे उभारणे, शाळांचे खाजगीकरण थांबविणे, खासदार-आमदार पेंशन बंद करण्यासाठी सभागृहात ठराव मांडणे आदी मागण्यांचा समावेश केला आहे.नंदलाल काडगायेंच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष महेंद्र धावडे,धिरज पंचबुध्दे,मेघश्याम काटेखाये,गजानन दोबाडकर,संतोष खोब्रागडे,डॉ. कार्तिक मेंढे,संतोष बांडेबुचे,डॉ.रोहित पिसे,मुकेश मुटकुरे,राजेश मते,सुनिल भोंगाडे,रवी भांडारकर,प्रकाश हटवार,अतुल दोनाडकर,जितेंद्र मेंढे यांनी धुरा सांभाळली आहे.