विदर्भ राज्याची निर्मिती न केल्यामुळे  भंडारा-गोंदियात भाजपाचा पराभव- आमदार देशमुख

0
13

नागपूर,दि. ३१ ‘भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी भाजपाचे हेमंत पटले यांचा पराभव केला. भारतीय जनता पार्टीचा एकेकाळी गढ असलेला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ साम-दाम-दंड-भेद चा वापर करूनही भाजपाच्या हातातून गेला. या पराभवासाठी खुद्द भाजपाच जबाबदार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत दिलेले आश्वासन भाजपाने पाळले नाही म्हणून या पराभवाचा सामना भाजपाला करावा लागलाङ्क, अशी टीका काटोलचे भाजपाचे विदर्भवादी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली. वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास संपूर्ण विदर्भात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागेल, असे स्पष्ट संकेत आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी फार आधीच दिले होते. येणाऱ्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका भाजपाला जिंकायच्या असतील तर वेगळ्या विदर्भ राज्यासाठी दिलेले आश्वासन पाळावे व तात्काळ विदर्भ राज्याची निर्मिती करावी अन्यथा यापेक्षा दारूण पराभवाचा सामना विदर्भाच्या १० लोकसभा व ६२ विधानसभा मतदारसंघात करावा लागेल, अशी सूचना त्यांनी सरकारला केली आहे.
डिसेंबर २०१३ मध्ये डॉ. आशिष देशमुख हे वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषणाच्या आठव्या दिवशी भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. नितीनजी गडकरी तसेच भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व सध्याचे मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी ‘केंद्रात भाजपा सत्तेत आल्यास विदर्भ राज्याची निर्मिती करूङ्क, असे आश्वासन देऊन त्यांचे उपोषण संपविले होते. त्यानंतर, २०१४ मध्ये लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ‘सत्तेत आल्यास वेगळे विदर्भ राज्य निर्माण करूङ्क, असे आश्वासन भाजपाने विदर्भातील जनतेला दिले होते. विदर्भातील जनतेच्या भरवशावर भाजपा सत्तेत आली. विदर्भातील ६२ पैकी ४४ जागा भाजपाने जिंकल्या. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आणण्यात विदर्भातील मतदारांनी मोठी भूमिका बजावली. पण राज्यकर्त्यांना विदर्भ राज्याचा विसर पडला. त्यामुळे विदर्भातील जनता नाराज आहे.
केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाचे पूर्ण बहुमत असतांना मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदींना वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्यात काहीच अडचण नाही. शिवसेनेचा जरी विरोध असला तरी राज्य निर्मितीचा विषय हा पूर्णत: केंद्र सरकारच्या अधिकारातील विषय आहे. तेव्हा मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदींनी पुढाकार घेऊन येणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ठराव मांडावा व विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी शेवटी केली.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील समस्यांबद्दल आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले,ङ्कभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील समस्यांकडेसुद्धा भाजपाच्या राज्य सरकारने दुर्लक्ष केले. भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. गोसीखुर्द व बावनथडीसारखे मोठे सिंचन प्रकल्प असूनसुद्धा सिंचनाचा प्रश्न आहे. सिंचनाच्या नहारांची कामे अजून सुरु झाली नाहीत. सिंचनासाठी अधिग्रहित झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. माजी मालगुजारी तलाव (मामा तलाव) भरपूर आहेत पण देखरेख व दुरुस्ती अभावी तसेच गाळामुळे त्यांची सिंचन क्षमता कमी झाली आहे. पाण्याची वितरण प्रणाली बरोबर नाही. यात जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. जिल्ह्यात धान व सोयाबीन प्रमुख पिके आहेत. दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही. तलावात पाणी कमी असल्यामुळे मत्स्यपालन हा पूरक व्यवसाय जवळपास बुडाला आहे. अशोक लेलँड, सनफ्लॅग सारखे उद्योग आहेत पण त्यांच्या रोजगार निर्मितीच्या मर्यादा आहेत. गोंदिया जिल्ह्यात तिरोडा येथे अदानी वीज निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील प्रदूषण वाढले आहे, जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासकीय योजनांची माहिती व लाभ ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. सिंचनाचा मोठा प्रश्न असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. या संपूर्ण मतदारसंघात बेरोजगारीची अत्यंत गंभीर समस्या आहे. एम.आय.डी.सी.मधील बरेचसे प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उद्योगधंदे नसल्यामुळे युवकांचे रोजगारासाठी इतर प्रदेशात स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. गुन्हेगारी वाढली आहे. विधवा महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहेच.ङ्क