२०९ महाविद्यालयांत प्रवेशबंदी

0
15

गोंदिया,दि.02 : बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०९ संलग्नित महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील ९८ महाविद्यालयांनी निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज केले नाहीत. यातील अनेक महाविद्यालये अनेक वर्षांपासून केवळ कागदांवरच आहेत. शिवाय महाविद्यालयांना सातत्याने ‘एलईसी’ची प्रक्रिया राबवून घ्यावी लागते.
विद्यापीठात नियमांनुसार प्राध्यापक तसेच इतर सोईसुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठातर्फे ‘एलईसी’ नेमण्यात येते. मात्र महाविद्यालयांना संबंधित समितीला बोलवावे लागते. यासंदर्भात २९ महाविद्यालयांनी कुठलीही हालचाल केलेली नाही. या महाविद्यालयांना वारंवार विचारणादेखील करण्यात आली. मात्र तरीदेखील काही फरक पडलेला नाही. ८२ महाविद्यालयांमध्ये आवश्यक नियमित शिक्षक, कर्मचारी व सोईसुविधा नसल्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले आहेत.
प्रवेशबंदीच्या या यादीमध्ये नागपुरातील अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे. शिक्षक, कर्मचारी नसल्यामुळे अनेक मोठ्या महाविद्यालयांतील काही अभ्यासक्रमांना प्रवेशबंदी लावण्यात आली आहे.
शिक्षक, कर्मचारी व सुविधा नसल्यामुळे या महाविद्यालयात प्रवेशबंदी
अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय, पहेला, भंडारा (बीकॉम)
गीताचार्य तुकारामदादा आर्टस्, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज, लाखांदूर, भंडारा (बीएस्सी, बीकॉम)
पार्वताबाई मदनकर कला व वाणिज्य महाविद्यालय, वरठी, भंडारा (एमए-मराठी, इतिहास, समाजशास्त्र)
एस.चंद्रा महिला महाविद्यालय, साकोली, भंडारा ( बीएस्सी)
निर्धनराव पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आंधळगाव, भंडारा (बीकॉम, बीएस्सी)
भारत सेवक सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोंढा, भंडारा (बीकॉम, बीएस्सी)
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, पवनी, भंडारा ( बीएस्सी-गृहविज्ञान)
प्रचिती महिला महाविद्यालय ,मोहाडी, भंडारा (बीएस्सी-गृहविज्ञान)
इंदुताई मेमोरिअल बॅचलर आॅफ लायब्ररी अ‍ॅन्ड इन्फॉर्मेशन सायन्स कॉलेज, तुमसर, भंडारा (बी.लिब., एम.लिब., सी.लिब., बीजे)
‘एलईसी’ प्रक्रिया न राबविल्यामुळे प्रवेशबंदी
जान्हवी कॉलेज आॅफ होम सायन्स, लाखांदुर, भंडारा़
निर्धनराव पाटिल वाघाये कॉलेज आॅफ एज्युकेशन, तुमसर
निर्धनराव पाटिल वाघाये कॉलेज आॅफ एज्युकेशन, साकोली
निर्धनराव पाटिल वाघाये कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साकोली
ज्ञानेश्वर मेंघरे शिक्षण महाविद्यालय, भंडारा़
़निर्धन पाटिल वाघाये शिक्षण महाविद्यालय, लाखनी
लक्ष्मीबाई आर्ट्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज, तुमसर
लक्ष्मीबाई बीबीए अ‍ॅन्ड बीसीए कॉलेज, लाखांदुर
तिरुपति कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखनी
तिरुपति आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज, लाखांदुर
आदिलोक महिला बीएड कॉलेज, गोरेगांव

संलग्निकरणासाठी अर्ज नसल्यामुळे प्रवेशबंदी
वैनगंगा इन्स्टिटयूट आॅफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज, साकोली
मनोहरभाई पटेल कॉलेज आॅफ एज्युकेशन, भंडारा
डॉ अरुण मोटघरे मास्टर आॅफ एज्युकेशन, भंडारा
हरीश मोरे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,भंडारा
श्री साई बीएड कॉलेज, भंडारा़
पुंडलिकराव तिरपुड़े कॉलेज आॅफ एज्युकेशन, लाखनी, भंडारा
नवयुवा महाविद्यालय, भंडारा
अनुराग शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मोहाडी,भंडारा़
महाराणा प्रताप कॉलेज आॅफ एज्युकेशन, भंडारा़
विद्यानिकेतन कॉलेज, भंडारा़
विद्याभारती कॉलेज, तुमसर
डॉ. मालतीताई उमाठे कॉलेज, भंडारा
स्व.़निर्धनराव पाटिल वाघाये कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साकोली
तिरुपति कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भंडारा
विनोद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पवनी
डोमाजी जांभुळकर टेक्निकल कॉलेज, साकोली
नर्मदाबाई ठवकर कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड मॅनेजमेन्ट, भंडारा
तिरुपति आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायंस कॉलेज, लाखांदुर
़निर्धनराव पाटिल वाघाये कॉलेज, साकोली
निर्धनराव पाटिल वाघाये बीबीए कॉलेज, पालांदुर