पी.डी.रहागंडाले विद्यालयाचा निकाल ९२.१९ टक्के

0
13

गोरेगाव,दि.९ः- येथील पी.डी.रहागंडाले विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयाचा १० वीचा निकाल ९२.१९ टक्के लागला असून १४१ पैकी १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयाची साक्षी प्रविण डोमळे ही विद्यार्थीनी ९४.६० टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली.तर रुपाली सोमेश्वर रहागंडाले हिने ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय व कुणाली इंद्रराज येळे हिने ८५.६० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.संस्थाध्यक्ष एड.टी.बी.कटरे,आर.एफ.पटले,यु.टी.बिसेन,टी.डी.पटलेसह सर्व पदाधिकारी,प्राचार्य एच.डी.कावळे,पर्यवेक्षक वाय.आर.चौधरी तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले.याच विद्यालयातील साहिल डोमळे,सौरभ श्रीभ्रदे,मयुरी हरिणखेडे,पल्लवी रहागंडाले,संतोष गावराणे,जयश्री नागरीकर ,आस्था पटले व संदेश चव्हाण यांनीही यश मिळविले आहे.