बालाघाटसह पुर्व विदर्भातील जिल्ह्यात आढळले 90 सारस

0
6

गोंदिया,दि.17 : गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यावर अनेक संकट असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील त्यांच्या संर्वधनासाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. १० जून रोजी २२ पथकांनी केलेल्या सारस गणनेत पुर्व विदर्भातील गोंदिया,भंडारा व चंद्रपूरसह दक्षिण बालाघाट जिल्ह्यात 90 सारसांची गणना करण्यात आली.त्यामध्ये  गोंदिया जिल्ह्यात ३४ ते ३८ व बालाघाट जिल्ह्यात ४४ ते ४८ सारसांची संख्या आढळल्याची माहिती सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार व  संरक्षण प्रकल्प प्रभारी आय.आर. गौतम यांनी दिली आहे. गोंदिया व बालाघाट या सारस स्केपमध्ये सारसांची संख्या ८६ झाली आहे. सन २०१७ च्या गणनेनुसार महाराष्ट्रात ३८ ते ४२ सारस होते. सन २०१८ च्या गणनेत सारसांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर काही सारसांचा  विषबाधा व करंट लागून मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात ३ सारस तर चंद्रपूर येथे एक सारस आढळला आहे.
१० ते १६ जून या दरम्यान सारस गणना करण्यात आली. जिल्ह्यातील शेत, तलाव व नदीकाठी ही गणना करण्यात आली. यांतर्गत, सतत सहा दिवस ५० ते ६० ठिकाणी २२ पथकांच्या माध्यमातून सारस गणना करण्यात आली. मागील ४-५ वर्षापासून सेवा संस्थेद्वारे बालाघाट जिल्ह्यातही सारस संरक्षण व संवर्धनाचे काम स्थानिक स्वयंसेवी संस्थेकडून शेतकऱ्यांच्या मदतीने करण्यात येत आहे.सारस गणनेसाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, बालाघाटचे जिल्हाधिकारी डी.व्ही. सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, बालाघाटचे वन मंडळ अधिकारी देवप्रसाद यांनी सहकार्य केले. सारस गणनेला जिल्हा प्रशासन, गोंदिया निसर्ग मंडळ, वन विभाग गोंदिया, वनविभाग बालाघाट व चंद्रपूरच्या इको प्रो संस्थेने सहकार्य केले.
सारस गणना करणाऱ्यांमध्ये मुनेश गौतम, सावन बहेकार, अभिजीत परिहार, अभय कोचर, दुष्यंत रेंभे, अंकीत ठाकूर, शशांक लाडेकर, चेतन जसानी, मुकुंद धुर्वे, संजय आकरे, बबलू चुटे, दुष्यंत आकरे, अशोक पडोळे, प्रविण मेंढे, जलाराम बुधेवार, विशाल कटरे, कन्हैया उदापुरे, मोहन राणा, सलीम शेख, राकेश चुटे, रतीराम क्षीरसागर, पिंटू वंजारी, रूचीर देशमुख, अश्वीनी पटेल, सिकंदर मिश्रा, कमलेश कामडे, निशांत देशमुख, हरगोविंद टेंभरे, राहूल भावे, विकास महारवाडे, महेंद्र फरकुनडे, जयपाल ठाकूर, विकास फरकुंडे, विक्रांत साखरे, विजय विदानी, मधुसूदन डोये, शेरबहादूर कटरे, निखील बिसेन, रमेश नागरिकर, चंदनलाल रहांगडाले, बंटी शर्मा, डिलेश कुसराम व प्रशांत मेंढे यांचा समावेश होता.