खासगी शाळांतील शिक्षक भरती स्वत: करणार

0
13

मुंबई ,दि.21- शिक्षण सम्राटांना राज्‍य सरकारने जोरदार दणका दिला आहे. आतापर्यंत रखडलेल्‍या खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरतीचा निर्णय राज्‍य सरकारने जाहीर केला आहे. यानूसार ही शिक्षक भरती आता राज्‍य सरकारतर्फे केली जाणार आहे. यापूर्वी ही भरती शिक्षण संस्थांतर्फे केली जायची. त्‍यामध्‍ये मोठ्या प्रमाणात गैरव्‍यवहार होत असल्‍याने शासनाच्‍या या निर्णयामुळे त्‍याला चाप बसण्‍याची शक्‍यता आहे.

राज्‍य सरकारने हा निर्णय 23 जून, 2017 रोजीच घेतला होता. मात्र त्‍याची अंमलबजावणी आतापर्यंत करण्‍यात आली नव्‍हती. मात्र आता दरवर्षी मे महिन्‍यामध्‍ये शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे. त्‍यानूसार इच्‍छूक शिक्षकांची प्रथम परिक्षा घेण्‍यात येणार असून मेरिटनूसार त्‍यांची निवड केली जाणार आहे. त्‍यानंतर खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र शाळांत सरकारतर्फे त्‍यांची नियुक्‍ती केली जाईल. शिक्षक भरतीसाठी पवित्र व्हिजिबल टू ऑल टिचर्स या पोर्टलचा उपयोग केला जाणार आहे. राज्‍याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आगामी 6 महिन्‍यांत शिक्षकांच्‍या 24 हजार जागा भरल्‍या जातील, अशी घोषणा फेब्रुवारीमध्‍ये केली आहे.