गोंदिया जिल्ह्यात योग दिवस उत्साहात

0
26

गोंदिया,,दि.21ः- येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भूजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.अखिल भारतीय गायत्री परिवार,पतंजली योग समिती,नेहरु युवा केंद्र,योग मित्र मंडल,ब्रम्हकुमारी ईश्वरिय विश्वविद्यालय,आर्ट आॅफ लिविंग,आरोग्य भारती आदी संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.शहरातील हजारोच्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग घेतला.

सामाजिक व धार्मिक सद्भावणे करिता प्रसिद्ध असलेल्या तिरोडा शहरात आज २१ जून रोजी जागतिक योगदिना निमित्ताने झालेल्या योग उत्सवात येथील १७ समित्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील महिला पुरुष सहभागी झाले यात काही मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता.     योगाचा कुठल्याही जाती धर्माशी संबंध नसून ११ डिसेंबर १४ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून जागतिक योगदिन जाहीर केल्यानुसार जगात सर्वत्र साजरा करण्यात येत असलेल्या योग दिनानिमित्त शाहिद भीमा ज्युनियर कॉलेजच्या पटांगणावर तिरोडा नगर योग उत्सव समिती तर्फे आयोजित योग्य उत्सवात अखिल विश्व गायत्री परिवार, प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पतंजली योग समिती, गुरुदेव सेवा मंडळ, श्रमशक्ती संघटन, साईबाबा क्रिकेट क्लब, सत्य साईबाबा समिती, लायन्स मेन्स क्लब, लॉय क्लब, केंद्रीय मानवाधिकार समिती, सकल ब्राम्हण समाज, तालुका क्रिडा समिती, विद्याभरती वाटीका, मातृशक्ती संघटना सदस्य तसेच पोलिस स्टेशन तिरोडाचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक कैलास गवते, शहिद मिश्रा कॉलेज चे प्राचार्य मंत्री, जिल्हा परिषद विद्यालयाचे प्राचार्य रहांगडाले, पतंजली चे अशोक मिश्रा सर्व संघटनाचे पदाधिकारी तिरोडा पोलिस महिला पुरुष व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद केंद्रीय शाळा ठाणा येथे योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शोभेलाल कटरे, टिकाराम भेलावे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,देबीलाल केवट सदस्य,नरेन्द्र बिसेन ऊ श्रे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच केंद्रप्रमुख हर्दुले उपस्थित होते.जि.प.उ.प्रा शाळा हलबीटोला केंद्र खमारी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य व( विद्यार्थी 22+24) अंगनवाडी शिक्षिका, मुख्याध्यापिका के .एम.मुलतानी,यशोधरा सोनेवाने,यु.एम.ठाकरे,शोभा फंदी,जयश्री तरोने उपस्थित होते.