महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात

0
10

नांदेड,दि.22: राष्ट्रवीर, हिन्दूकुलभूषण, वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 479 व्या जयंतीनिमित्त  भव्य शोभायात्रेचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले. सकाळी साडेआठ वाजता चैतन्यनगर येथील शिवमंदिरापासून या शोभायात्रेचा शुभारंभ नांदेड उत्तरचे आमदार माजी मंत्री डी.पी. सावंत व महापौर सौ. शीला भवरे यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमा पुजनाने झाला.

यावेळी किशोर भवरे, नगरसेविका गुरूप्रितकौर सोढी, बालाजी कल्याणकर, संतोष मुळे, विनायक सगर, दिलीपसिंघ सोढी, संगीता तुप्पेकर, अमितसिंह तेहरा, दिलीप ठाकूर, दत्ता कोकाटे, सतीश देशमुख, प्रकाश मारावार आदि मान्यवर उपस्थित होते. चैतन्यनगर शिवमंदिरापासून ही शोभायात्रा राजकॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागार्जुन कॉर्नर या मार्गे वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याकडे आली. शोभायात्रेत घोडे, बँड यांच्यासह फेटेधारी राजपूत समाजबांधव व अन्य मान्यवर सहभागी झाले. महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्याजवळ शोभायात्रेचे सभेत रूपांतर झाले. आ. हेमंत पाटील यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. शोभायात्रेत सहभागी झालेल्यांनी   महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तथा पुष्पहार अर्पण केला. तसेच या ठिकाणी हल्दीघाटी येथील पवित्र मातीचा तिलक सर्वांनी आपल्या कपाळी लावला. अनेक मान्यवरांनी यावेळी समाजप्रबोधनपर विचार मांडले.

यावेळी दिलीपसिंह हजारी, बलदेवसिंह चौहान, भगवानसिंह चंदेल, अमरसिंह चौहान, शरदसिंह चौधरी, मोहनसिंह तौर, बाबुसिंह चौहान, अर्जुनसिंह ठाकूर, विठ्ठलसिंह गहेरवार, राम चव्हाण, बालाजी चव्हाण, रविंद्रसिंह गौर, अविनाश ठाकूर, राजतिलक हजारी, जगदिशसिंह ठाकूर, रविसिंह परिहार, हनीसिंह चौधरी, राहूलसिंह ठाकूर, दत्तूसिंह चंदेल, महेंद्रसिंह ठाकूर, गजेंद्रसिंह चंदेल, गणेंद्रसिंह चंदेल, दिपक चव्हाण यांच्यासह समाजातील महिला व पुरूष मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शोभायात्रेत सहभागी झालेल्यांसाठी खिचडी व पुलाव यांचे वाटप भगवानसिंह चंदेल यांनी केले. तर शरदसिंह चौधरी यांच्यावतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.