आश्रमशाळेत समावेश न केल्यामुळे स्वंयपाकी करणार आत्मदहन 

0
27
बिलोली (सय्यद रियाज),दि.30ःः तालूक्यातील अर्जापुर येथील अनूदानीत आदिवासी आश्रम शाळेत 2006 पासून कार्यरत राहिलेले परंतु  30 एप्रिल  2016 पासून विद्यार्थी पटसंख्येंभावी व भौतिक सुविधा कमी असल्यामुळे आश्रमशाळा बंद पडल्याने या आश्रमशाळेतील  दर्यापुर निवासी शेकलोड अशोक मारोती या स्वयंपाकी कर्मचार्याला कुणीही सामावून घ्यायला तयार नसल्याने आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.नाशिक येथील आदिवासी विभाग आयुक्त कार्यालयाने शेकलोड़ यांना चार आश्रमशाळामध्ये प्रतिनियुक्ती दिली.मात्र त्या आश्रमशाळा व्यवस्थापनाने रुजू करुन घेण्यास नकार दिल्याने बिनपगारी जिवन जगण्याची वेळ आली आहे.
शेकलोड हे गेल्या दोन वर्षापासून बिलोली ते ठाणे असे फे-या मारत आहे . त्यांना 7 डिसेंबर 2016 , रोजी अनुदानीत आदिवासी आश्रम शाळा गजांड ता. डहाणू जिल्हा पालघर,  4 अॉक्टोंबर 2017  अनुदानीत आदिवासी आश्रम शाळा कोसबाड हिल तालूका डवानु पालघर, 2फेब्रुवारी 2018 ,   कामशेत तालूका मावळ जि.पुणे 7 जून 2018 अदिवासी आश्रम शाळा ओतुर ता. जुन्नर जि.पुणे  या चार  वेळेस संस्थेत रुजु होण्यासाठी  अॉडर ही दिण्यात आले मात्र त्या संस्थेने रुजू करुन घेतले नाही .त्यामुळे अखेर शेकलोड यांनी आदिवासी आयुक्तांना पत्र पाठवून 2 जुर्लेपुर्वी समायोजन न झाल्यास आदिवासी विभाग कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचाच इशारा दिला आहे.