पवित्र वेबपोर्टलचे शिक्षण मंत्री विनोद तावडेनी केले उदघाटन

0
30
नागपूर दि.7ः, – महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती गणुवत्तेवर आधारित व पारदर्शक पध्दतीने व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागाने “पवित्र” या बेवपोर्टलची निर्मिती केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदातिन व विनाअनुदानित पदांवरील इयत्ता 1 ली ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांच्या भरतीसाठी तयार करण्यात आलेले “पवित्र” हे वेबपोर्टल आजपासून सुरु करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षणमंत्री  विनोद तावडे यांच्या हस्ते “पवित्र” या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. या नंतर या “पवित्र” वेबपोर्टल संदर्भात माहिती देताना श्री. तावडे यांनी सांगितले की, यापूर्वी खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती. परंतू, आता “पवित्र” या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रिय पध्दतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे. उपरोक्त नमूद केलेल्या संबंधित विभागामध्ये शिक्षक पदाच्या रिक्त जागा असतील तर त्या संबंधित विभागाने रिक्त पदांची माहिती “पवित्र” या वेबपोर्टलवर देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे स्थानिक वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिध्द करावयाची आहे, असेही  तावडे यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाच्या 20 जून 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार सदरची कार्यपध्दती विषद करण्यात आली आहे, त्याची माहिती देताना  तावडे यांनी सांगितले की, 6 जुलै 2018 पासून पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)  मध्ये 0 पेक्षा अधिक गुण प्राप्त असलेले विदयार्थी व शिक्षक पात्रता परिक्षा (TET) पात्र विद्यार्थी हे इ. 1 ते 5 तसेच इ. 6 ते 8 मधील प्रवर्गानुसार व समांतर आरक्षणानुसार रिक्त जागांवर पवित्र प्रणालीमध्ये अर्ज करू शकतात. इ. 9 वी ते 12 वी साठीच्या रिक्त जागांवर अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT) मध्ये “0”  पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.edustaff.maharashtra.gov.in/pavitra या संकेतस्थळावर नोंदणी (registration) करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीचा आसन क्रमांक हाच उमेदवाराचा User Id असेल. नोंदणी करण्यासाची कार्यपध्दती User manual मध्ये दिलेली आहे.
  भरती प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे राहतील –-
1)   पहिला टप्पा – पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांनी स्वत:ची माहिती भरणे.
2)   दुसरा टप्पा – संस्थांनी पवित्र प्रणालीमध्ये online तसेच स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करणे.
3)   तिसरा टप्पा – संस्थांच्या जाहीरातीनुसार उमेदवारांनी 20 पसंतीक्रम निवडणे.
4)   चौथा टप्पा –  गुणवत्तेनुसार संस्थांना निवड याद्या उपलब्ध्‍  करून देणे.
ही निवड प्रक्रिया अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेमधील (TAIT) गुणांच्या तसेच प्रवर्ग व समांतर आरक्षण निहाय उपलब्ध्‍ जागा, उमेदवाराने भरलेला पसंतीक्रम इ. च्या आधारे केली जाणार आहे.पेसा क्षेत्रातील पालघर, गडचिरोली येथील शिक्षक भरती पेसा मधील तरतुदीनुसार करण्यात येईल.शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी TAIT ही परिक्षा 1 लाख 78 हजार उमेदवारांनी उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी “पवित्र” च्या माध्यमातून अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये याची दक्षता विभागाने घेतली आहे. अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीच्या (TAIT) आसन क्रमांकानुसार अर्ज करण्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर (Pavitra Portal) वर देण्यात आले आहे.
त्यानुसार उमेदवारांसाठी अर्ज तयार करण्यासाठी खालील वेळापत्रक देण्यात आले आहे, असेही  तावडे यांनी सांगितले.
दिनांक     TAIT परीक्षा आसन क्रमांक    पासून   पर्यंत
06/07/2018 ते 08/07/2018  SED_ TAIT_0000001   SED_ TAIT_0005000
09/07/2018 ते 11/07/2018 SED_ TAIT_0005001 SED_ TAIT_0015000
12/07/2018 ते 15/07/2018  SED_ TAIT_0015001  SED_ TAIT_0030000
16/07/2018 ते 18/07/2018  SED_ TAIT_0030001  SED_ TAIT_0045000
19/07/2018 ते 22/07/2018 SED_ TAIT_0045001   SED_ TAIT_0060000
23/07/2018 ते 25/07/2018 SED_ TAIT_0060001  SED_ TAIT_0075000
26/07/2018 ते 29/07/2018  SED_ TAIT_0075001 SED_ TAIT_0090000
30/07/2018 ते 01/08/2018  SED_ TAIT_0090001 SED_ TAIT_0105000
02/08/2018 ते 05/08/2018 SED_ TAIT_0105001 SED_ TAIT_0120000
06/08/2018 ते 08/08/2018 SED_ TAIT_0120001 SED_ TAIT_0135000
09/08/2018 ते 12/08/2018  SED_ TAIT_0135001  SED_ TAIT_0150000
13/08/2018 ते 15/08/2018   SED_ TAIT_0150001  SED_ TAIT_0165000
16/08/2018 ते 19/08/2018  SED_ TAIT_0165001  SED_ TAIT_0180000
20/08/2018 ते 23/08/2018  SED_ TAIT_0180001 SED_ TAIT_0199143
वरील वेळापत्रकात दर्शविलेल्या कालावधीमध्ये नमूद केलेल्या बैठक क्रमांकांच्या उमेदवारांनाच अर्ज करता येतील.  या व्यतिरिक्त इतर बैठक क्रमांकांच्या उमेदवारांना इतर तारखांना अर्ज करता येणार नाही. वरील कालावधीत अर्ज करताना उमेदवारांच्या TAIT  व TET परीक्षेमधील नाव, जन्मतारीख, लिंग या माहितीमध्ये तफावत असल्यास अशा अमेदवारांनी पडताळणीसाठी नमूद केलेल्या जिल्हयातील शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांचेकडून संबंधित उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून माहिती approve करण्यात येईल. अशा उमेदवारांना दिनांक 23/08/2018 नंतर पवित्र प्रणालीमध्ये अर्ज करण्याची सुविधा देण्यात येईल. उपरोक्त वेळापत्रकामध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बदलाबाबतची माहिती पवित्र पोर्टलवर दर्शविण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी वेळापत्रकातील बदल वेळोवेळी पाहणे आवश्यक राहील.
उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक व इतर अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालयामध्ये तसेच ज्या जिल्हयांमध्ये महानगरपालिका आहेत, त्या जिल्हयांच्या महानगरपालिका कार्यालयातील शिक्षण विभागामध्ये मदत कक्ष उभारण्यात आलेला आहे.उमेदवारांनी त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हयातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक),  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालय किंवा महानगर पालिका कार्यालयाच्या शिक्षण विभागातील मदत कक्षाशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.