राष्ट्रवादीच्यावतीने 17 जुर्लेला ईव्हीएम व मनुस्मृतीचे दहन

0
12

गोंदिया,दि.07ः-देशातील लोकशाही धोक्यात आली असून सत्ताधारी पक्ष संविधानाला बाजूला सारून देशात मनुस्मृतीप्रमाणे कामकाज करण्याचा प्रयत्न करीत असल्याने राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्यावतीने येत्या 17 जुर्लेरोजी नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात संविधान बचाव कार्यक्रमांतर्गत ईव्हीएम व मनुस्मृतीचे दहन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी दिली.त्या गोंदिया येथे पक्षाच्या कार्यक्रमाकरीता आल्या असता विश्रामगृहात पत्रपरिषदेत बोलत होत्या.पत्रपरिषदेला माजी महापौर राजलक्ष्मी भोसले,सुरेखाताई ठाकरे,महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,छायाताई चव्हाण,सुशीला भालेराव,लता रहागंडाले उपस्थित होत्या.

श्रीमती खान म्हणाल्या की इग्रंजापासून स्वातंत्र्य होण्यासाठी लढाई लढल्यानंतर आता संविधानाच्या रक्षणासाठी दुसरी लढाई लढण्याची वेळ आली आहे.केंद्रातील विद्यमान सरकार हे भारतीय संविधानाला बाजूला सारून मनुस्मृतीप्रमाणे कामकाज करु पाहत असून त्याची अप्रत्यक्ष अमलबजावणी सुरु केली आहे.तर निवडणुकीत वापरल्या जाणार्या ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे.त्याकरीता राष्ट्रवादी कांँग्रेसच्यावतीने राष्ट्रव्यापी सविंधान बचाव आंदोलन सुरु करण्यात आले आहे.त्याअंतर्गतच येत्या 17 जुर्लेला नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी 1 वाजता विदर्भातील महिला कार्यकर्ता पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सविंधान बचाव आंदोलन करण्यात येणार आहे.त्या कार्यक्रमामध्ये ईव्हीएमचे व मनुस्मृतीचे दहन करुन लोकशाही विरोधी सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार असल्याची माहिती दिली.सोबतच कुठलाही लोकप्रतिनिधी असो त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा व्हायला हवी.उन्नान येथे घडलेल्या घटनेचा निषेध करीत त्याप्रकरणातील भाजप आमदारांनी केलेले कृत्य निषेधार्ह असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.सध्याचे प्रधानमंत्री यांना लोकशाही पध्दतीने काम करता येत नसून त्यांनी स्वतःला प्रसारमंत्री बनविल्याची टिका ही केली.मनुस्मृतीच्या माध्यमातून लोकशाहीला मारण्याचे काम विद्यमान सरकार करीत असल्याचेही खान म्हणाल्या.