‘दादा वासवानी विश्वशांती दूत होते’: राज्यपाल

0
6

मुंबई,दि.13ः- साधू वासवानी मिशनचे संस्थापक आणि ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु दादा जशन वासवानी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अलीकडेच एका कार्यक्रमानिमित्त दादा वासवानी यांची आपली भेट झाली होती. काही दिवसातच ते वयाची शंभरी पूर्ण करणार होते; त्या अगोदरच त्यांचे जाणे क्लेशदायक आहे.

दादा वासवानी एक प्रज्ञासंपन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. आपल्या प्रवचनांमधून, लिखाणातून तसेच व्यापक सेवाकार्यातून त्यांनी देश-विदेशातील लाखो लोकांना समाजोपयोगी जीवन जगण्यास प्रेरित केले. आपले गुरु, साधू वासवानी यांच्या स्मरणार्थ त्यांनी सुरु केलेल्या साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून त्यांनी असंख्य वंचित, गरीब आणि उपेक्षित लोकांच्या जीवनात आनंद आणि आशा जागवली. त्यांनी प्राणिमात्रांप्रती प्रेम व भूतदया यांचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक विश्वशांतीदूत गमावला आहे. राज्यातील जनतेच्या वतीने तसेच स्वतःच्या वतीने मी दादा वासवानी यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. साधू वासवानी मिशन त्यांचे कार्य सुरु निष्ठेने आणि बांधिलकीने सुरु ठेवेल असा विश्वास व्यक्त करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.