साइंस ऑलिम्पियाड फाउंडेशनद्वारे प्रोगेसिव्हचे शिक्षक सन्मानित

0
5

गोंदिया,दि.20ः-श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारा संचालित प्रोगेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूल्स येथे साइंस ऑलिम्पियाड फाउंडेशनद्वारे दरवर्षी ऑलिम्पियाड परीक्षेचे आयोजन केले जाते. यात शाळेचे सर्व पदाधिकारी केन्द्र संचालनाच्या कार्यात नेहमी उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून साइंस ऑलिम्पियाड फाउंडेशनद्वारे प्रोगेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूल्सच्या शिक्षकाचा सत्कार करण्यात आला.
यात प्रामुख्याने वाय. आशा राव सर्वाेत्कृष्ट प्राचार्य व महेशकुमार पटले सवरेत्कृष्ट निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यांना स्मृतिचिन्ह व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे प्राचार्य वाय. आशा राव यांनी प्राप्त पुरुस्कृत धनराशी प्रोगेसिव्ह इंटरनॅशनल स्कूलच्या शाळायोजने अंतर्गत विद्यार्थ्यासाठी भेट दिली.
सर्व सन्मानित शिक्षकांचे संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ.एन.आर.कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले,कुमुदिनी तवाडे, कुलदिप भौतिक, मीनाक्षी महापात्रा, रेहाना शेख, अभय गुरव,वीणा कावडे, निधी व्यास, कृष्णा चौहान, वर्षा सतदेवे, प्रमोद वाडी, विकास पटले,रुपकला रहांगडाले, राफिया शेख, कल्याणी रहांगडाले, तोमेश पारधी, डॉ.लालचंद पारधी, राहुल रामटेके, दिव्यांशू जैस्वाल व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.