कुटुंबातील प्रत्येक कर्जदाराला मिळणार कर्जमाफीचा लाभ-सहकार मंञी सुभाष देशमुख यांची घोषणा‎

0
10

कर्जमाफी योजनेतील कुटुंबाची अट शिथिल*
नागपुर दि.२०: छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत असलेली कुटुंबाची अट आता शिथिल केली असुन कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दिड लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा सहकार मंञी सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत केली.
निवेदनात श्री देशमुख पुढे म्हणाले की, या निर्णयामुळे कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पती, पत्नी वे मुले यांना प्रत्येकी दिड लाख ‎रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.त्यानुषंगाने एक रकमी परतफेड योजनेत पाञ झालेल्या शेतकर्यांना भरावी लागणारी रक्कम कमी होवून जास्तीत जास्त शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे, असेही त्यांनी निवेदनात सांगितले.