घणाघाती आरोपानंतर राहुल गांधींनी दिली मोदींना ‘जादूची झप्पी’

0
12

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था),दि.20- मोदी सरकार विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. राहुल गांधी यांनी राफेल विमान करार, बेरोजगारी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या आरोपामुळे सत्ताधार्‍यांनी प्रचंड गदारोळ केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झोके घेत असताना चिनी सैनिकांनी भारताच्या क्षेत्रात घुसखोरी केली होती, असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी माझ्या नजरेस नजर मिळवू शकत नाहीत, असेही राहुल म्हणाले. मोदींच्या दबावात येथून संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाला खोटे सांगितले. सरकारच्या जुलुमांचा शिकार देशातील शेतकरी ठरत आहे.देशभरात महिला, दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महिला संरक्षणात मोदी सरकारचे अपयशी ठरले आहेत. देशात अत्याचारासोबतच दडपशाहीही वाढली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी सत्तेशिवाय राहू शकत नाही. देशाचे संविधान, लोकशाहीवर हल्ला केला जात आहे.

काँग्रेस ही एक भावना आहे. ती भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन, असं म्हणून राहुल यांनी भाषण संपवलं आणि ते वेलमधून थेट मोदींच्या खुर्चीकडे गेले. त्यांनी मोदींना आलिंगनासाठी उभं राहण्याची विनंती केली. पण, ते उभे राहत नाहीत, असं पाहून राहुल यांनी स्वतःच पुढे होत त्यांना मिठी मारली.  ‘आप सब लोगों के अंदर मेरे लिए नफरत है. आप मुझे पप्पू और बहोत गालियाँ देकर बुला सकते है. लेकीन मेरे दिल मे आपके नफरत नही है’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.