मुख्य बातम्या:

राज्य कर्मचार्यांचा तीन दिवसीय संप यशस्वी करण्याचे आवाहन

गोंदिया,दि.21ः- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आणि गोंदिया जिल्हा समन्वय समिती व विविध संवर्ग संघटना पदाधिकारी, कार्यकत्र्यांची ७,८ व ९ ऑगस्ट च्या तीन दिवसीय संपाबाबत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ कार्यालयात सभा घेण्यात आली.या सभेत आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.सभेला पी.जी.शहारे, अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, विरेंद्र कटरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ,  चंद्रशेखर वैद्य  सचिव पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटना,कमलेस बिसेन अध्यक्ष ग्राम सेवक संघटना,आर.आर.मिश्रा अध्यक्ष चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, आशीष रामटेके अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना,भुमेस्वर फुंडे कार्यवाह महाराष्ट्र शिक्षक परिषद, गुणवंत ठाकूर अध्यक्ष लिपीक कर्मचारी संघटना, श्री नेवारे अध्यक्ष जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी, श्रीमती काळे मँडम, नर्षेश फेडरेशन आणि लिलाधर पाथोडे सरचिटणीस व निमंत्रक गोंदिया जिल्हा समन्वय समिती उपस्थित होते. मदन चुरे अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना गोंदिया जिल्हा यांनी आभार मानले.

Share