तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाला शासकीय अभियांत्रिकी पदवीमध्ये रूपांतर करा : केशवराव मानकर

0
6

गोंदिया,दि.२३ : होतकरु व गुणवंत विद्याथ्र्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण मिळावे, या करीता शासनाने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम सुरु केले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात खासगी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम सुरु आहेत. परंतु विद्याथ्र्याचा कल अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमापलीकडे असल्यामुळे तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम महाविद्यालये ओस पडत चालले आहेत. यामुळे पदविका अभ्यासक्रम महाविद्यालयांना शासकीस पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयात रुंपांतर करण्यात यावे,अशी मागणी माजी विधान परिषद सदस्य केशवराव मानकर यांनी केली आहे. गोंदिया जिल्हा आदिवासी क्षेत्र असून होतकरू व गुणवंत विद्याथ्र्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण मिळावे म्हणून गोंदियाला शासकीय तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम सुध्दा सुरू आहेत. तसेच माजी केंद्रीयमंत्री प्रपुल्ल पटेल यांनी १९८३ ला मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रम सुरू केले. परंतु हे अभियांत्रिकी महाविद्यालय काही कारणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात एकमेव पदवी अभियांत्रिकी कॉलेज असल्यामुळे जिल्ह्यातील विद्याथ्र्यांना सोईचे होत होते. अनेक विद्याथ्र्याचा कल पदविका अभ्यासक्रमाकडे कमी असल्यामुळे पदविका अभ्यासक्रम ओस पडत आहेत. करीता जर पदविका अभ्यासक्रमाला शासकीस पदवी अभ्यासक्रमात रूपांतर केले तर विद्याथ्र्यांच्या दृष्टीने सोईचे होईल. गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यात शासनाने हा प्रयोग केलेला आहे आणि प्रयोग यशस्वी झालेला आहे. तेथील पदविका अभ्यासक्रमाचे रूंपातर पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे.आणि प्रवेश देणे सुद्धा सुरू केले आहे. हाच प्रयोग गोंदिया जिल्ह्यात करण्यात यावे, अशी मागणी माजी विधान परिषद सदस्य केशवराव मानकर यांनी केले आहे. तसेच विद्याथ्र्यांच्या हितासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे केशवराव मानकर यांनी सांगीतले आहे