प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 31 जुलै पर्यंत मुदतवाढ.

0
9
भागवत देवसरकर यांच्या मागणीला यश.
नांदेड. दि.23ः- प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढण्यासाठी सरकारने 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पिकाचा विमा काढण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी   सरकारकडे  पाठपुरावा व मागणी केली होती याचीच दखल घेऊन 31 जुलै पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मागील आठवड्यात शेतकऱ्यांनी CAC केंद्रावर जाऊन गर्दी केली होती.पहिल्यांदा 7/12 ची अडचण व नंतर पोर्टल डाऊन असल्यामुळे शेतकरी हैराण झाले होते.त्यातच बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने CAC केंद्रावर तान येत होता. जिल्यात केवळ तीन लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढला होता.लाखो शेतकरी पीकविमा काढण्यापासून वंचित राहू लागले होते.याचीच दखल घेऊन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी  कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळासह जाऊन मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली होती.आता बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आता CAC केंद्रावर जाऊन 31 जुलै पर्यंत आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे.जिल्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढावा असे आवाहन भागवत देवसरकर यांनी केले आहे.