काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामे देणार?

0
9

मुंबई,दि.30(विशेष प्रतिनिधी): राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याची तयारी काँग्रेसच्या बैठकित केली आहे.  यामध्ये अनेक आमदारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सामूहिक राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. मात्र या मुद्यावर पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाच्या आमदारांच्या भावना अतिशय तीव्र असल्याचे चव्हाण म्हणाले. ‘पक्षाच्या बैठकीत अनेक आमदारांनी सामूहिक राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. तर काहींनी याबद्दल सभागृहात सरकारला जाब विचारायला हवा, अशी भूमिका मांडली. मात्र याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही,’ चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या आमदारांसह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. राज्यातील परिस्थिती स्फोटक आहे. यामध्ये हस्तक्षेप करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली. याबद्दलचे निवेदनदेखील काँग्रेसने राज्यपालांना दिले.