राष्ट्रवादीच्या गोवा प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

0
11

वृत्तसंस्था
पणजी, -राष्ट्रवादी कॉंगे्रसचे गोवा प्रदेेशाध्यक्ष निळकंठ हलर्णकर यांनी आज शनिवारी पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या कामगिरीवर आपण नाराज असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात स्पष्ट केले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने गोव्यातून एकही उमेदवार उभा केला नाही. त्यानंतर झालेची पणजीची पोटनिवडणूकही लढविली नाही. सध्या जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत. पण, या निवडणुका लढण्याचीही पक्षाची इच्छा नाही. सततच्या पराभवामुळे पक्ष खचला असल्याचेच यावरून स्पष्ट होते, असे हलर्णकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आपण केवळ प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्ष सोडलेला नाही. पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून आपण काम करणार आहे. अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.