बँकेची रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात

0
16

चंद्रपुर,दि.31ः- जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर-अल्ट्राटेक सिमेंट मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे.सोमवारला झालेल्या कार व ट्रकच्या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बँक कर्मचारी अनिल देवलवार , बँकेचे सुरक्षारक्षक नामदेव गेडाम, शैलेज कुमार  व वाहन चालक भगवान यांचा समावेश आहे. अल्ट्राटेक आवारपूर येथील एसबीआय बँकेमधून गडचांदूर येथील एसबीआयच्या शाखेत रक्कम पोहचवण्याकरीता वाहनाने चारहीजण जात असताना गडचांदूर अल्ट्राटेक मार्गावरील वळणावर हा अपघात घडला. गडचांदूर कडून अल्ट्राटेक कडे येणारा बल ट्रान्सपोर्टच्या एम.एच. ३४ ए.डी. ९८२२ क्रमांकाच्या ट्रकने अल्ट्राटेककडून गडचांदूरकडे जाणाऱ्या कार क्रमांक एम.एच.३४ ए.एम.९७८० जोरदार धडक दिली. या धडकेत जवळपास तीस मिटर पर्यंत वाहन फेकल्या गेले. अपघात झाल्याबरोबर सुदैवाने एअर बॅग निघाल्यामुळे समोर बसून असलेला सुरक्षा रक्षक व वाहन चालकाचे प्राण वाचले.