शेकडो युवकांना फसविणाऱ्या रणसिंगला अटक करा

0
8

भंडारा ,दि.01: जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार युवक, युवतींना महाराष्ट्र शासनाची नोकरी देण्याचा नावावर कोटी रुपयांचा गंडा घालून फसवणूक करणाऱ्या विजय राजेंद्र रणसिंग याला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र भोंडेकर यांची केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात नेमप्लेटसह कार्यालय थाटून स्वत:ची गाडी त्या गाडीवर महाराष्ट्र शासन लिहून तिरंगा झेंडा लावून विजय रणसिंग याचा मागील ६ महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात गोरखधंदा सुरू होता. तोच स्वत:ला महिला व बालविकास विभागाचा उपसचिव असून माझे पंकजाताई मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे व स्वत:कडे बनावट प्रमाणपत्रे व कागदपत्र तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात स्वत:चे कार्यालय स्थापन केले होते. नागपूर येथील सचिवालय कार्यालयात या कटकारस्थानात फसवणूक झालेल्या बेरोजगारांची मुलाखतीसाठी बोलवून पैसे मात्र घरी जाऊन घ्यायचा. भंडारा जिल्हाधिकारी इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयातून दोन ते पाच लाख रुपये घायचा. विजय रणसिंंग याने शहरात ज्या घरमालकाकडे भाड्याने राहायचा त्या घरमालकाच्या पत्नीला व त्यांच्या नातेवाईकांनासुद्धा सोडले नाही. जिल्ह्यातील अशा किमान ७० ते ८० बेरोजगारांकडून करोडो रुपये उकळले. या इसमाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली तर प्रत्यक्षात दोनशेहून अधिक बेरोजगारांची फसवणूक केल्याचे निदर्शनास येण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या प्रकरणात फसवणुकीचे प्रकरण झाले असताना सुद्धा हे बेरोजगार पोलीस स्टेशन भंडारा तसेच जवाहरनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास गेले असता पोलीस प्रशासनाने तक्रार नोंदवून घेण्यास तयार नव्हते. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करून सदर प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशरा शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे..