एनएएफच्या देशव्यापी अभियानाला उत्स्फुर्ते प्रतिसाद

0
17

हैद्राबाद,दि.०२(विशेष प्रतिनिधी)ः- राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या१५० व्या जयंती निमित्त मानवंदना म्हणून इंडियन पोलिटिकल एॅक्शन कमिटीने ((IPAC) ) ङ्कनॅशनल अजेंडा फोरम(NAF) या देशव्यापी कार्यक्रमाला सुरवात केली आहे.गांधीजींच्या विचारसरणीवर आधारित १८ मुद्द्यांवर हा अखिल भारतीय रचनात्मक कार्यक्रम २९ जूनपासून सुरू करण्यात आलेला आहे.
आपला नेता कसा असावा, त्याने कोणत्या गोष्टींवर काम करावे यासाठीचा अजेंडा देशाच्या प्रत्येक व्यक्तीला ठरवता यावा हा या नॅशनल अजेंडा फोरमचा उद्देश आहे.देशातील प्रत्येक व्यक्ती या फोरममध्ये सहभागी होऊ शकतो. या नॅशनल अजेंडा फोरमला गेल्या ३० दिवसात देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे.आत्तापर्यंत२८,९०१ युवक, १४२ प्रतिष्ठित व्यक्ती,२०६सामाजिक संस्था या फोरममध्ये सहभागी झाल्याची माहिती फोरमच्यावतीने देण्यात आली आहे.
यामध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते गांधीवादी डॉक्टर रवींद्रकुमार, नेटवर ठक्कर, गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रमुख डी चे लदुराई, स्वातंत्र्य सेनानी बाजी मोहम्मद तसेच गांधीवादी संस्था सर्वोदय आश्रम,गांधी मिशन इंटरनॅशनल सोसायटी ऑफ इंडिया सहभागी झाले आहेत.
तसेच काही प्रसिद्ध कलाकार पद्मभूषण पुरस्कार्थी श्रीमती तिजनबाई,भारतीय शास्त्रीय गायिका पदभूषण पुरस्कार विजेते राजन मिश्रा, कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे पद्मश्री ब्रह्मदत्त, पद्मश्री पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉक्टर उषा किरण खान तसेच काही प्रतिष्ठित सरकारी अधिकारी जसे मेघालयचे माजी राज्यपाल श्री रणजित शेखर मोशहारी, राजस्थान आणि गुजरात उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एन एन माथूर यांनी देखील या नॅशनल अजेंडा फोरमला पाठिंबा दर्शवला आहे.
क्रीडा क्षेत्रातील नामांकित खेळाडूंनी पण या फोरमला पाठिंबा दिला आहे. यामध्ये ऑलम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोम, कॉमनवेल्थगेम्स मधील सुवर्णपदक विजेती बबिता फोगाट,भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार आय एम विजयन, क्रिकेटर ईश्वर पांडे यांचा सहभाग आहे.
क्रीडा सोबत मनोरंजन विश्वातल्या कलाकारांनी देखील या फोरममध्ये सहभाग नोंदवला आहे.जसे अभिनेते,पटकथा लेखक, गीतकार पियुष मिश्रा,मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगिला,गायिका,गीतकार व भांगडा डान्सर पम्मीबाई यांनी उत्स्फूर्तसह भाग नोंदवला आहे.
पुढील दोन आठवड्यात इंडियन पोलिटिकल एक्शन कमिटी २१ राज्यातील ७५० महाविद्यालये व ३२० सामाजिक संस्थापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे.
         NAF मध्ये सामील होण्याकरिता नागरिकांनी  https://www.indianpac.com/naf/ लॉगइन करून एजेंडा व योग्य नेत्यांची नेमणूक करण्याकरिता मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.