न्याय न मिळाल्यास आंदोलन करणार-सचिन घनमारे

0
8

भंडारा,दि.02ः- ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भंडारा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज ०२ आॅगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन पाठवित न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा ईशाला देण्यात आला आहे.
निवेदनात सामाजिक न्याय विभागाने ११ जुर्लेला काढलेल्या अध्यादेशात सरकारी योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वर्षावरुन ६० वर्ष केली.मात्र आजही जिल्ह्यातील नागरिाकंना त्या अध्यादेशाप्रमाणे लाभ मिळत नसल्याने अध्यादेश काढुनही काय औचित्य अशा प्रश्न निर्माण झाला आहे.या सर्व प्रकरणाला घेऊन भंडारा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज निवेदन सादर करण्यात आले.त्या निवेदनात खासगी वैद्यकीय संस्था, रुग्णालये, प्राप्तिकर, प्रवास, व नगर पालिकाकेच्या करात ज्येष्ठांना सवलत देण्याचे अध्यादेश काढण्यात आले.मात्र अमलंबजावणी होत नसल्याने याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसू लागला आहे. ६० वर्षावरील नागरिकांना एस. टी. बस मधे प्रवास केल्यास पुर्ण टिकिट द्यावी लागत आहे.एस. टी. महामंडळ ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचा काम करत आहे. राज्य सरकार व सामाजिक न्याय मंत्री यांनी ज्येष्ठ नागरिकांना फसवण्याचे काम केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष सचिन घनमारे,भंडारा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजकपूर राऊत,प्रा.मारबते,हिरामण लांजेवार,लक्ष्मणराव वानखेडे,जीवन भजनकर,कोमल कळबे,दत्तात्रय वानखेडे,विनीत देशपांडे, पराग खोब्रागडे,अमेय डोंगरे,प्रमोद वासनिक इत्यादी काँग्रेस पदाधिकारी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.