आमगाव तालुक्यात मतदार यादीचे विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम

0
18

आमगाव,दि.04ःः१५ ते २0 जून मतदार यादीचे विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम व ७ जून ते ६ जुलै इछड यांचे घरोघरी भेटी देऊन मतदार यादी शुध्दीकरण या कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी आमगाव तालुक्यातील २८७८७ कुटुंबांना भेटी दिल्या व माहिती गोळा केली. ज्या मतदारांचे मतदार यादीत फोटो ब्लॅकन्ड व्हाईट आहेत अशा मतदारांची संख्या आमगाव तालुक्यात २७१७५ मतदार आहेत, त्यापैकी इछड यांनी १७,६९२ रंगीत छायाचित्र जमा केलेले आहेत. एफड ठएळ या आज्ञावलीत ब्लॅकर्‍न्ड व्हाईटचे रंगीत छायाचित्राचे अपलोडींगचे काम सुरू आहे.
आमगाव तालुक्यात एकाच नावाचे दोन मतदार असलेले (दुबार नाव) एकूण १२१८ मतदार आहेत. त्या सर्वांना नोटीस देण्यात आले आहे. त्यापैकी ४३0 नोटी कार्यालयास उपलब्ध झाले असून २३१ नोटीसावर वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
आमगाव तालुक्यात मतदार यादीमध्ये फोटो नसलेल्या मतदारांची संख्या २३५३ असून सर्वांचे फोटो गोळा करण्याची कार्यवाही सुरु आहे. आमगाव तालुक्यात एकूण ११८ मतदान केंद्र असून ग्रामीण भागातील ३ मतदान केंद्रात १२00 च्यावर मतदार असंल्यामुळे ३ मतदान केंद्राचे विभाजन करण्यात आले आहे. आमगाव तालुक्यात एकूण २७३ अपंग मतदार आढळून आलेले आहे.
दिव्यांग मतदारांना मार्गदर्शन व नविन दिव्यांग मतदारांचे मतदार यादीत नाव नोंदणीकरीता ६ ऑगस्ट २0१८ रोजी नगरपरिषद कार्यालय आमगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व दिव्यांग मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे सहायक मतदार नोंदणी अधिका