मराठा मोर्चा आंदोलन अखेर मागे

0
16
बीड,दि.07 – गेल्या 21 दिवसापासून सुरू असलेले मराठा मोर्चा आंदोलन आज अखेर न्यायालयाच्या सुनावणीनंतर मागे घेण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे या आंदोलनाने महाराष्ट्रात तीव्र स्वरूप घेतले होते. या आंदोलनादरम्यान गंगापूर येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केली होते, हे येथे विशेष.
या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून शपथपत्र सादर करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही याबाबतचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत देऊ, असे न्या. एम. जी. गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील मागासवर्ग आयोगाने सांगिल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली. अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आयोगाने मागितलेला तीन महिन्यांचा कालावधी जास्त आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने पुकारलेले आंदोलन तीव्र होत असून, त्यात आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. न्यायालयाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला आपला अहवाल लवकरात लवकर सादर करण्यास सांगावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली. त्यानंतर,बीड जिल्ह्याच्या परळी येथून सुरु झालेले मराठा आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.