इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनची स्थापना अध्यक्षपदी महेश तिवारी

0
8

गडचिरोली,दि.१०ः- जिल्हयातल्या ईलेक्ट्रानिक मिडीयात काम करणा-या सदस्यांसाठी नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली.या नव्या संघटनेची कार्यकारिणी आज निवडण्यात आली आहे. सिरोंचा येथील विश्रामगृहात ही बैठक पार पडली असून या बैठकीत सर्वानुमते जेष्ट पञकार न्युज 18 लोकमतचे चंद्रपूर-गडचिरोली प्रतिनिधी महेश तिवारी यांची जिल्हाध्यक्षपदी तर टीवी 9 चे मोहम्मद इरफान यांची उपाध्यपदावर तर एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी रोमीत तोंबीर्लावार यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.
आजतक चे व्यंकटेश दुडमवार यांची कोषाध्यक्षपदावर निवड करण्यात आली कार्यकारिणीच्या उर्वरीत सदस्यामध्ये MH माझाचे सतिश राचर्लावार, विदर्भ मिडीयाचे अमित तेपट्टीवार., सर्च वाहीनीचे महेश गुंडेटीवार, एनटीवीचे श्रवण किर्ती तसेच जेके 24 चे अशोक दुर्गम यांची निवड करण्यात आली . कार्यकारिणीच्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. यावेळी पहिल्यांदाच पार पाडलेल्या या बैठकीत जेष्ठ पत्रकार महेश तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये काम करणार असल्याने सर्व सदस्यांनी आनंद व्यक्त केला.
तसेच अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाल्याने महेश तिवारी यांनी सर्वांना मार्गदर्शन करून त्यांनी सुद्धा सर्वांना शुभेच्छा दिली आणि संघटनेला मजबूत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले. एकंदरीत गडचिरोली जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन च्या अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.